मेडशीच्या ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:28 AM2017-08-01T01:28:53+5:302017-08-01T01:29:44+5:30

मेडशी : मेडशी येथील ग्रामसेवकाच्या कारभाराला कंटाळून ३१ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनामुळे ३१ जुलैला असलेली मासिक सभा सरपंच रेखा मेटांगे यांनी तहकूब केली.

Village villagers locked the Gram Panchayat office! | मेडशीच्या ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप!

मेडशीच्या ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप!

Next
ठळक मुद्देग्रामसेवकाच्या कारभाराला कंटाळून ठोकले कुलूपआंदोलनामुळे मासिक सभा तहकूबकोणतेही कागदपत्रं वेळेवर मिळत नसल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी : मेडशी येथील ग्रामसेवकाच्या कारभाराला कंटाळून ३१ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनामुळे ३१ जुलैला असलेली मासिक सभा सरपंच रेखा मेटांगे यांनी तहकूब केली.
मेडशी ग्रामपंचायतच्या कार्यकाळातील ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे, विधवा, निराधारांना लागणारी कागदपत्रे ही विनाविलंब व मोफत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, यासाठीदेखील देवाण-घेवाण करावी लागते. तसेच वेळेवर कोणतेही कागदपत्रं मिळत नाहीत, असा आरोप करीत ग्रामस्थांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. पैसे दिल्याशिवाय ग्रामपंचायतमध्ये कोणतेही काम होत नाही, घरकुल योजनेत अनुसूचित जाती व जमातीतील लाभार्थींची नावे ‘इतर’ या रकान्यात का टाकण्यात येतात, असा सवाल विचारून घरकुल योजनेतून विधवा महिलांसह पात्र लाभार्थींना डावलण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. घरकुल व शौचालयाचे अनुदान मिळण्यासाठी कर्मचाºयांकडून पैसे मागितले जातात, ही गंभीर बाब असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी म्हटले. पैसे मागणारा व घेणारा कोण? याची चौकशी होणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनाला सरपंच रेखा मेटांगे, अश्विनी वानखडे, कैलास इंगळे, दत्ता घुगे यांच्यासह सहा ते सात ग्रामपंचायत सदस्यांनी पाठिंबा दर्शविला. यावरून ग्रामपंचायतच्या कर्मचाºयांचा कारभार कसा सुरू आहे, याचा प्रत्यय येतो, अशा प्रतिक्रिया आंदोलनादरम्यान नागरिकांनी व्यक्त केल्या. या आंदोलनामुळे गैरकारभार करणाºयांचे धाबे दणाणले आहे. या गंभीर समस्येकडे वरिष्ठ पातळीवरील प्रशासन लक्ष देते की नाही, याकडे मेडशी ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. यावेळी भारिप-बमसंचे तालुकाध्यक्ष संदीप सावळे, शौकत पठाण, दीपक वानखडे, सुलोचना सावळे यांच्यासह महिला व ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Web Title: Village villagers locked the Gram Panchayat office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.