रिसोड तालुक्यात गावाेगावी योग शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:52+5:302021-07-20T04:27:52+5:30
रिसोड तालुक्यात तालुका आरोग्य विभाग अंतर्गत मोप,मांगुळ झनक, कवठा,केनवड असे चार प्राथमिक आरोग्य केंद्र येतात. या केंद्रांतर्गत येत असलेल्या ...
रिसोड तालुक्यात तालुका आरोग्य विभाग अंतर्गत मोप,मांगुळ झनक, कवठा,केनवड असे चार प्राथमिक आरोग्य केंद्र येतात. या केंद्रांतर्गत येत असलेल्या प्रत्येक गावात आरोग्य विभागाच्या वतीने योग शिक्षक नेमून दैनंदिन मोफत योग शिबिर घेण्यात येत आहेत. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येक नागरिकाची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. या शिबिराला महिला, युवक, नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मोप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत योग शिक्षक शीतल जिरवणकर, मांगुळ झनक प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत योग शिक्षक सरोज चव्हाण, कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत योग शिक्षक किशोर राऊत तर केनवड प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत योग शिक्षक गणेश देशमुख हे घरोघरी जाऊन नागरिकांची योग विषयी जनजागृती करीत आहेत.
०००
चावडीवर योगाचे प्रशिक्षण
योग शिक्षक हे गावातील चावडीवर योगाचे प्रशिक्षण देत आहेत. तालुक्यातील पळसखेड येथे योग शिक्षक किशोर राऊत यांनी १६ जुलै रोजी योग शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. योग शिबिर यशस्वी करण्याकरिता योग शिक्षकांसह आरोग्य विभागाचे डॉ. शंकरराव वाघ, कर्मचारी विजय नाईकवाडे, भारत पारवे,आशा,अंगणवाडी सेविका,सरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक आदींनी पुढाकार घेतला आहे.