विविध मागण्यांसाठी करंजीवासियांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 02:33 PM2018-09-03T14:33:13+5:302018-09-03T14:33:44+5:30
जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिसोड तालुक्यातील करंजी येथील एस.व्ही. राऊत यांच्यासह नागरिकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - प्रलंबित कामांना प्राधान्य न देता नवीन सिंचन विहीर प्रकरणाची चौकशी करावी, गत तीन वर्षांचे सेसनिहाय आॅडिट करावे यासह अन्य विषयांकडे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिसोड तालुक्यातील करंजी येथील एस.व्ही. राऊत यांच्यासह नागरिकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले आहे.
करंजी गरड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित कामांना प्राधान्य न देता नवीन सिंचन विहिरीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन रिसोड गटविकास अधिकाºयांनी दिले होते. तथापि, अद्याप चौकशी करण्यात आली नसल्याने याप्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करावी या मागणीसाठी एस.व्ही. राऊत यांच्यासह नागरिकांनी उपोषण आंदोलन सुरू केले. त्याचबरोबर गावठाणमधील निवासी अतिक्रमणाची प्रकरणे गटविकास अधिकाºयांमार्फत उपविभागीय अधिकाºयांकडे तातडीने सादर करावी, मागील तीन वर्षांचे ग्रामपंचायतचे सेसनिहाय आॅडिट करावे तसेच गाव नमुना १ ते ११ अद्ययावत आहेत की नाही याची तपासणी करावी अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी केली. सिंचन विहिरी, वृक्षारोपण कामांची तपासणी व मजूर उपस्थिती न पाहता मजूरांना पैसे काढून दिले जातात, या प्रकरणाची चौकशी करावी यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण आंदोलन पुकारले आहे. सोमवारी आंदोलनस्थळी रिसोड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबुराव शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट देऊन वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.