मेडशी ग्रामपंचायत ला ग्रामस्थानी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:43 PM2017-07-31T13:43:12+5:302017-07-31T13:46:46+5:30

villagers put lokc on grampanchayat office | मेडशी ग्रामपंचायत ला ग्रामस्थानी ठोकले कुलूप

मेडशी ग्रामपंचायत ला ग्रामस्थानी ठोकले कुलूप

Next
ठळक मुद्देग्रामविकास अधिकारी देण्याच्या मागणीसाठी

मेडशी - मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याला 2 वर्षा आधी कामात  केलेल्या गैरव्यवहारात निलंबित व्हावे लागले .तेंव्हापासून येथील धुरा प्रभारी ग्रामसेवकाच्या खांदयावर आहे. गावकार्याना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास होत असल्याने भारिप बहुजन महासंघाने  आक्रमक होत तालुका अध्यक्ष संदीप सावळे ,दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात सरपंच  ,ग्राम पंचायत सदस्यांसह ग्रामस्थाने  ग्राम पंचायत कार्यालयाला आज  टाळा ठोकला आहे .आज होणारी मासिक सभाही रद्द करण्यात आली .
 ग्रामसेवक दिलिप वाहोकार यांच्याकडे गत एका वर्षा पासून मेडशी ग्राम पंचायत चा  प्रभार आहे याठिकाणी कायम स्वरूपी ग्रामविकास अधिकाऱयांना रुजू होण्याचे आदेश ९ वेळा देण्यात आले आहेत पण गाव खराब असल्याचे कारण पुढे करत ग्रामविकास अधिकाऱयांनी गटविकास अधिकार्याशी आर्थिक देवाण करत मेडशीत न येण्याचा त शॉर्टकट शोधला असल्याचा आरोप होत आहे .ग्रामसेवक दिलीप वाहोकार यांच्यांवर अतिरिक्त कामाचा भार वाढल्याने  त्यांनी प्रभार काढण्याची विनंती वरिष्ठ  अधिकाऱयांना केली   मेडशी गाव मोठे आहे   येथे ग्रामविकास अधिकाऱयांची पोस्ट असताना ग्रामसेवकाकडे प्रभार देण्यात काय गौडबंगाल आहे हे शोधून काढणे गरजेचे आहे .सरपंचासह ग्रामस्थाणी गटविकास अधिकाऱयांना ग्रामविकास अधिकारी देण्यासाठी वारंवार निवेदन दिले मात्र त्यांना केराची टोपली दाखविण्यात आली.  जोपर्यंत मेडशीला ग्रामविकास अधिकारी दिल्या जात नाही तोपर्यंत ग्रामपंचायतचा कारभार चालु देणार नसल्याच्या इशारा सरपंच,ग्रामपंचायत सदस्य ,भारिप बहुजन महासंघासह ग्रामस्थानी दिला आहे

Web Title: villagers put lokc on grampanchayat office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.