गाव पूनर्वसनासाठी वाडी रामराववासी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 06:26 PM2017-12-04T18:26:07+5:302017-12-04T18:28:01+5:30
वाशिम : येथील काटेपूर्णा नदी पूर्णपणे दगडाने भरली असून थोडा जरी पाऊस झाला की, गावाला धोका निर्माण होतो. त्याकरिता वाडी रामराव गावाचे पूनर्वसन करावे किंवा काटेपूर्णा नदीचे खोलीकरण करण्याच्या मागणीसाठी वाडी रामरावासीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ४ नोव्हेंबर रोजी धडक देवून आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.
वाशिम : येथील काटेपूर्णा नदी पूर्णपणे दगडाने भरली असून थोडा जरी पाऊस झाला की, गावाला धोका निर्माण होतो. त्याकरिता वाडी रामराव गावाचे पूनर्वसन करावे किंवा काटेपूर्णा नदीचे खोलीकरण करण्याच्या मागणीसाठी वाडी रामरावासीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ४ नोव्हेंबर रोजी धडक देवून आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. निवेदनावर शेकडो शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.
वाडी रामराववासियांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, १९८३ साली मोठया प्रमाणात आलेल्या महापुरामुळे गावात थैमान घातले होते. सर्व गाव टेकडीच्या ठिकाणी जावून रात्र काढली होतीत्र त्यावेळी खासदार गुलामनबी आझाद , तहसीलदार यांनी गावाची पाहणी करुन गाव पूनर्वसनाचे आश्वासन दिले होते. तेव्हापासून नदीला पूर आल्यास धोका निर्माण होण्याची शकयता ग्रामस्थांमध्ये आहे.
दरवर्षी गावाला लागून पूर जातो एखादयावेळी संपूर्ण गाव या पुरात वाहून जाण्याची शक्यता आहे. त्या नदीला गावाच्यावर तीन धरण झाले आहेत. तसेच जऊळका येथे त्या नदीला मोठा बॅरेज आहे. त्या बॅरेजमध्ये पाणी फुल झाल्यावर जास्त पाऊस आला की, त्यातील पाणी एकाएकी सोडल्या जाते. अशावेळी गावाला धोका निर्माण होतो. म्हणून काटेपूर्णा नदीला अमानवाडी गावापासून ते धरमवाडी गावापर्यंत खोलीकरण करणे गरजेचे आहे. असे झाल्यास गावाला धोका राहणार नाही. तसेच नदीकाठावरील हजारो एकर जमिन सिंचनाखाली येईल. करीता शासनाने याकडे लक्ष देवून गावकरकयांची मागणी पूर्ण करण्याचीमागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ३० डिसेंबर पर्यंत अधिकाºयांनी गावाची पाहणी न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर निळकंठ गुलाबराव घुगे, मंगेश पांडे, संतोष मुसळे, विठल भुरकाडे, निवास घुगे, देवानंद जाधव यांच्यासह शेकडो शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत. या निवेदनाच्या प्रती संबधितांनाही पाठविण्यात आल्या आहेत.