नेट कनेक्टिव्हिटी, वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:45+5:302021-01-08T06:10:45+5:30
किन्हीराजा या ११ हजार लोकसंख्येच्या गावात नामांकित कंपनीची मोबाइल सेवा (रेन्ज) ही मिळत नसल्याने जनतेचा एकमेकांची संपर्क तुटला आहे. ...
किन्हीराजा या ११ हजार लोकसंख्येच्या गावात नामांकित कंपनीची मोबाइल सेवा (रेन्ज) ही मिळत नसल्याने जनतेचा एकमेकांची संपर्क तुटला आहे. तसेच विविध कामांसाठी नेट कनेक्टिव्हिटीमुळे मिळत नसल्याने कामे खाेळंबली आहेत. किन्हीराजा हे जिल्हा परिषदेच्या सर्कलचे गाव असून, गावात नामांकित दोन मोठ्या कंपनीचे कार्ड येथील मोबाइल ग्राहक वापरतात. दोन्ही मोबाइल कार्डला गत १५ दिवसांपासून कनेक्टिव्हिटीच मिळत नाही, त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत मोबाइल सेवा ही विस्कळीत राहत असल्याने उमेदवार व कार्यकर्ते बेचैन दिसून येत आहेत. तसेच एखादी अप्रिय घटना घडल्यास संपर्क कसा करावा? हा प्रश्न उपस्थित होत आहे. गावातील वीजपुरवठा हा भारनियमनाच्या नावावर दररोज दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहत असतो त्यामुळे सदर मोबाइल कंपनीकडून टाॅवरच्या देखभाल दुरुस्तीसाठी डिझेल मिळत नसल्याने हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे बाेलले जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या आनुषंगाने चांगलेच वातावरण तापत असताना निवडणुकीत उभे असलेले उमेदवार कार्यकर्त्यांशी संपर्क साधताना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. तरी माेबाइल कंपनीने याकडे लक्ष देऊन माेबाइल सेवा सुरळीत करण्याची मागणी तसेच वारंवार खंडित हाेत असलेला वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी किन्हीराजावासीयांतून केली जात आहे. या मागणीची त्वरित दखल न घेतल्यास ग्रामस्थ आंदाेलन करतील, असा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे.