रस्ताकामाची ग्रामस्थांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:52+5:302021-07-22T04:25:52+5:30

----- पाणंद रस्त्याची दुरवस्था वाशिम : कामरगाव परिसरातील काही पाणंद रस्त्यांची अवस्था वाईट आहे. त्यात गत आठवड्यात आलेल्या ...

Villagers waiting for road work | रस्ताकामाची ग्रामस्थांना प्रतीक्षा

रस्ताकामाची ग्रामस्थांना प्रतीक्षा

Next

-----

पाणंद रस्त्याची दुरवस्था

वाशिम : कामरगाव परिसरातील काही पाणंद रस्त्यांची अवस्था वाईट आहे. त्यात गत आठवड्यात आलेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्यांवर मोठमोठ्या नाल्याच तयार झाल्याने या भागातील शेतकऱ्यांची वहिवाटच बंद पडली आहे.

-----------

पीक पाहणी कार्यक्रम

वाशिम : तालुक्यात कृषी विभागामार्फत क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत पिकावरील कीड व रोग याबाबत निरीक्षणे घेतली जातात. आता या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, काही गावांना मंगळवारी भेटी देऊन कृषी विभागाने पीक पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

-------

२८ वाहनांवर दंडात्मक कारवाई

दगड उमरा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. यात २१ जुलै रोजी नियमांचे उल्लंघन करण्यासोबतच कागदपत्रे न ठेवल्याप्रकरणी २८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

------

बाभूळगाव परिसरात उघड्यावर शौचवारी

वाशिम : दगड उमरा येथून जवळच असलेल्या बाभूळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून उघड्यावर शौचवारी होत असल्याने गाव परिसरात घाण पसरून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

-----------

घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला

वाशिम : मानोरा तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम इंझोरी येथे काही दिवसांपासून घाणकचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, धूर फवारणीची मागणी होत आहे.

Web Title: Villagers waiting for road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.