तंटामुक्त गाव अभियानांतर्गतच्या गावांना जिल्हाबाह्य मुल्यांकनाची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:53 PM2017-11-26T23:53:30+5:302017-11-26T23:54:08+5:30

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गंत तंटामुक्तीसाठी पात्र ठरलेल्या मानोरा तालुक्यातील गावांना जिल्हाबाह्य मुल्यांकनाची प्रतीक्षा आहे. सन २०१६-१७ या सत्रातील जिल्हाबाह्य मुल्यांकनच झाले नसल्याने गावकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Villages under the tantamukta village campaign awaiting district exit! | तंटामुक्त गाव अभियानांतर्गतच्या गावांना जिल्हाबाह्य मुल्यांकनाची प्रतीक्षा !

तंटामुक्त गाव अभियानांतर्गतच्या गावांना जिल्हाबाह्य मुल्यांकनाची प्रतीक्षा !

Next
ठळक मुद्देमोहिमेचा वेग मंदावला पात्र गावांमध्ये संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गंत तंटामुक्तीसाठी पात्र ठरलेल्या मानोरा तालुक्यातील गावांना जिल्हाबाह्य मुल्यांकनाची प्रतीक्षा आहे. सन २०१६-१७ या सत्रातील जिल्हाबाह्य मुल्यांकनच झाले नसल्याने गावकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
तत्कालिन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान साकारले आहे. गावाची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी गावातील तंटे, वाद सामोपचारातून मिटविणे तसेच अवैध धंदे हद्दपार करणे या अभियानांतर्गत अभिप्रेत आहे. सुरूवातीला या अभियानांतर्गत बºयापैकी उपक्रम राबविण्यात आले. त्यानंतर अभियान मंदावल्याचे दिसून आले. मानोरा तालुक्यातील अनेक गावांनी या अभियानात सहभागी होत विविध उपक्रम राबविले. सन २०१६-१७ या सत्रात मानोरा तालुक्यातील अनेक गावांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी चार गावे जिल्ह्यांतर्गत मुल्यमापनात पात्र ठरली. त्यानंतर जिल्हा बाह्य मुल्यमापन होणे आवश्यक आहे. २०१६-१७ सत्र संपून बराच कालावधी लोटला आहे. तथापि, अद्यापही जिल्हा बाह्य मुल्यमापन झाले नाही. सन २०१७-१८ या नवीन सत्राला आॅगस्ट महिन्यापासून सुरूवात झाली असतानाही गतवर्षीच्या गावांचे जिल्हा बाह्य मुल्यमापन झाले नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. मुल्यमापनासंदर्भात ठोस माहिती नसल्याने गावकºयांमधून तर्कवितर्क लढविले जात आहेत.

वरिष्ठ कार्यालयाकडून बाह्य मुल्यांकनाबाबतील कुठल्याही प्रकारचा आदेश प्राप्त झालेला नाही. वरिष्ठांचे आदेश प्राप्त होताच बाह्य मुल्यांकनाला सुरूवात होईल.
- श्रीराम घुगे, पोलीस निरीक्षक, तंटामुक्त गाव अभियान कक्ष, वाशिम.

Web Title: Villages under the tantamukta village campaign awaiting district exit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.