शिरपूर येथे विनाई देवी शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 02:29 PM2018-10-20T14:29:39+5:302018-10-20T14:29:54+5:30

शिरपूर जैन: दरवर्षीप्रमाणे यंदाही शिरपूर जैन येथे मातंग बांधवांच्यावतीने २० आॅक्टोबर रोजी गावातून विनाईदेवीची शोभायात्रा काढण्यात आली.

Vinai Devi Shobhaatra at Shirpur | शिरपूर येथे विनाई देवी शोभायात्रा

शिरपूर येथे विनाई देवी शोभायात्रा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: दरवर्षीप्रमाणे यंदाही शिरपूर जैन येथे मातंग बांधवांच्यावतीने २० आॅक्टोबर रोजी गावातून विनाईदेवीची शोभायात्रा काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत अनेक मातंग समाज बांधव सहभागी झाले होते. 
मातंग समाजाच्यावतीने दरवर्षी विनाईदेवीची स्थापना करण्यात येते. यंदाही या उत्सवाचे आयोजन १८ आॅक्टोबरपासून सुरू झाले. यानिमित्त सतत तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या उत्सवाच्या समारोपानिमित्त २० आॅक्‍टोबर रोजी गावातून विनाई देवीची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मातंग समाजातील बहुसंख्य महिला व पुरूष सहभागी झाले होते. शोभायात्रेत तरुण मंडळी ढोल, ताशा आणि बँन्जोच्या तालावर थिरकताना दिसली. शोभायात्रेत फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. या शोभायात्रेत संजय कांबळे, श्रीराम कांबळे, विठ्ठल कांबळे, भगवान कांबळे, विश्वनाथ कांबळे, रवी कांबळे, बबन कांबळे, गजानन कांबळे, किशोर कांबळे, अनंता ताकतोडे, संतोष कांबळे यांच्यासह बहुसंख्य युवक, युवती सहभागी झाले होते.

Web Title: Vinai Devi Shobhaatra at Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.