आचारसंहितेचा भंग; उमेदवारावर गुन्हा!
By admin | Published: November 14, 2016 02:37 AM2016-11-14T02:37:08+5:302016-11-14T02:37:08+5:30
मंगरूळपीर येथील प्रकार
मंगरूळपीर, दि. १३- आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार बानो रहीम चौधरी यांच्यावर रविवार, १३ नोव्हेंबर रोजी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
१३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३0 च्या सुमारास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बानो चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाची कुठलीच पूर्वपरवानगी न घेता मंगरूळपीर शहरात दुचाकी रॅली काढून आचारसंहितेचा भंग केला, अशी तक्रार निवडणूक भरारी पथकाचे प्रमुख प्रकाश गणेशपुरे यांनी मंगरूळपीर पोलिसांत दाखल केली. त्यावरून मंगरूळपीर पोलिसांनी बानो चौधरी यांच्यासह त्यांच्या १00 ते १५0 कार्यकर्त्यांंवर भादंवि १८८, १७१ एच, १९४ व १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत.