पेट्राेल पंपावर सूचनांचे उल्लंघन; पंपावरील कर्मचारीच मास्कविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:32+5:302021-06-25T04:28:32+5:30
नंदकिशाेर नारे वाशिम : काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी झाले तरी धाेका अजून टळला नाही. याकरिता सर्वांनी मास्कचा ...
नंदकिशाेर नारे
वाशिम : काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी झाले तरी धाेका अजून टळला नाही. याकरिता सर्वांनी मास्कचा वापर करावा, प्रतिष्ठानांसमाेर ‘नाे मास्क नाे एन्ट्री’चे फलक लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत, तरीसुद्धा अनेक पेट्राेल पंपावर ‘नाे मास्क नाे एन्ट्री’चे फलक तर झळकताना दिसून येतात; परंतु सूचनांचे पालन हाेताना दिसून येत नाही. ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून तर चक्क वाहनात पेट्राेल भरून देणारे कर्मचारीच मास्कविना दिसून आले.
जिल्ह्यात काेराेना संसर्ग हाेण्याच्या प्रमाणात माेठ्या प्रमाणात दिवसेंदिवस घट हाेत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने जिल्हा पूर्णपणे अनलाॅक करण्यात आला. सर्व व्यवहार सुरळीत झाले. जिल्हा अनलाॅक करण्यात आला असला तरी नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करून आपले व शहरवासीयांचे आराेग्य अबािधत ठेवावे, अशा सूचना केल्या आहेत. तसेच प्रत्येक प्रतिष्ठान चालकांनी मास्क नाही प्रवेश नाही, असे फलक लावून नागरिकांना काेविड त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे; परंतु या नियमांचे पालन हाेताना दिसून येत नसल्याचे शहरातील काही पेट्राेल पंपांची पाहणी केली असता दिसून आले.
-----------
मास्कचा वापर न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड
जिल्हा अनलाॅक झाला असला तरी काेराेनाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. मास्कचा वापर न करणाऱ्यांसाठी ५०० रुपये दंड आकारण्यात येत असताना विनामास्क अनेक जण दिसून येतात.
----------
काेराेना : त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे आवाहन
काेराेना संसर्ग कमी हाेत असला तरी काेराेना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. काेराेना त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.