आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन; ग्राम विकास अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:19 AM2021-03-04T05:19:33+5:302021-03-04T05:19:33+5:30

कोरोना विषाणूचा जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा ...

Violation of the order to close the weekly market; Village Development Officer suspended | आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन; ग्राम विकास अधिकारी निलंबित

आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन; ग्राम विकास अधिकारी निलंबित

Next

कोरोना विषाणूचा जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा गट विकास अधिकारी यांच्या सभेमध्ये याबाबत वारंवार मौखिक सूचना केल्या आहेत. तरीही २५ फेब्रुवारी रोजी इंझोरी येथे आठवडी बाजार भरला. यासंदर्भात लोकमतने सचित्र वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत चाैकशी करण्यात आली. इंझोरी येथे कार्यरत ग्राम विकास अधिकारी किसन वडाळ यांनी कर्तव्यात कसूर करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते यांनी १ मार्च रोजी ग्राम विकास अधिकारी वडाळ यांना निलंबित केले.

Web Title: Violation of the order to close the weekly market; Village Development Officer suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.