लहान कुटूंबाच्या अटीचे उल्लंघन; अंगणवाडी मदतनीस कार्यमूक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 04:24 PM2019-02-02T16:24:53+5:302019-02-02T16:25:10+5:30
जोगलदरी (वाशिम): लहान कुटुंबाच्या अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील अंगणवाडी मदतनीस कल्पना भगत यांना बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी कार्यमूक्त करण्याची कार्यवाही केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगलदरी (वाशिम): लहान कुटुंबाच्या अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील अंगणवाडी मदतनीस कल्पना भगत यांना बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी कार्यमूक्त करण्याची कार्यवाही केली. जोगलदरी येथील धम्मानंद खिराडे यांनी या संदर्भात मागितलेल्या माहितीत कल्पना भगत यांना तीन अपत्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कल्पना भगत यांना १३ आॅगस्ट २०१४ रोजी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार जोगलदरी येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ मध्ये मदतनीस म्हणून नियुक्ती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र सादर करताना त्यांन शामल विपिन भगत आणि सुस्मिता विपिन भगत ही दोनच अपत्ये असल्याचे सांगितले होते. तसेच भविष्यात दोनपेक्षा अधिक अपत्ये होणार नाही, यासाठी कुटूंब नियोजन करणार असल्याचे त्यांनी नमूद केले होते. तथापि, जोगलदरी येथील धम्मानंद खिराडे यांनी याबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली. त्यावरून बालविकास प्रकल्प अधिकारी मंगरुळपीर यांनी जोगलदरी येथील अंगणवाडी सेविका सचिता सोनोने यांच्याकडून अहवाल मागितला. त्यात कल्पना भगत यांना तीन अपत्ये असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी कल्पना भगत यांना कार्यमूक्त करण्याची कार्यवाही केली.