लॉयन्स क्लबच्या दृष्टी उपक्रमाची लिमका बुकमध्ये नोंद
By admin | Published: May 19, 2017 07:42 PM2017-05-19T19:42:25+5:302017-05-19T19:42:25+5:30
एकाच वेळी एक लाख ४० हजार विद्यार्थी यशस्वी नेत्र तपासणी
लॉयन्स क्लबचे व्दितीय प्रांतपाल एमजेएफ डॉ. संजय वोरा यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात लॉयन्स क्लब इंटरनॅशनल डिस्टीक ३२३ एचटू अंतर्गत वाशिम जिल्हायासह औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बुलढाणा, हिंगोली, अकोला भुसावळ, जळगाव खा., धुळे व नंदुरबार याना १३ जिल्हयामध्ये ८ आॅक्टोबर २०१५ मध्ये दृष्टी हा उपक्रम एकाच दिवशी व एकाच वेळेत राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये तब्बल एक लाख ४० हजार ३८८ विद्यार्थी व विद्यार्थींनीची नेत्र तपासणी करण्यात आली होती. मल्टीपक चेअरपरसन लॉ.कुलभुषण मित्तक इंदौर व गव्हर्नर लॉय.एम.के.अग्रवाल यांचा प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या दृष्टी उपकराची लिमका बुधमध्ये नोंद व्हावी यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये १३ जिल्हयातील २५० शाळांनी सहभाग घेतला होता. तर ३ हजार दोनशे शिक्षकांच्या सहकार्याने एक लाख ४० हजार ३८८ विद्यार्थ्यांनी नेत्रदृष्टी तपासणी करुन घेतली होती. लॉयन्स सर्व पदाधिकारी सदस्य व शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने यशस्वी ठरलेल्या दृष्टी उपक्रमाचे मुख्य आयटीसेंटर स्थानिक लॉयन्स विद्यानिकेतन येथे उभारण्यात आले होते. सदर दृष्टी उपक्रमाची नोंद विश्व विख्यात लिमका बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आल्याचे प्रमाणपत्र १७ मे रोजी प्रांतपाल लॉ.डॉ.संजय वोरा यांना मिळाले असून डॉ.वोरा यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक आहे.