कामरगाव जि.प.शाळेत कृत्रीम घरट्यांची भेट
By admin | Published: May 6, 2017 01:36 PM2017-05-06T13:36:09+5:302017-05-06T13:36:09+5:30
पर्यावरण शिक्षण केंद्र व राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी कृत्रीम व सुंदर घरटी भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबविला.
कामरगाव : तालुक्यातील ग्राम कामरगाव जि.प.विद्यालयातील पर्यावरण मित्र, चिव चिव मंडळ, पर्यावरण शिक्षण केंद्र व राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी कृत्रीम व सुंदर घरटी भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबविला.
मुख्याध्यापीका सुरेखा देशमुख यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण मित्र गोपाल खाडे व निता तोडकर यांनी कार्यक््रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना घरटे कसे तयार करावे, याबाबतची कार्यशाळा घेवुन शिकविण्यात आले. आधुनिक राहणीमानामुळे पशुपक्षी व चिमण्यांना घरटी बनविण्यास जागा शिल्लक नसल्याने पर्यावरणास काय धोका निर्माण होत आहे याची जाणिव विद्यार्थ्यांना करुन दिली. विद्यार्थ्यांनी सुध्दा रुप व रंगत आकर्षक घरटे तयार केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या घरट्यांवर पाणी, हवा, प्रदुषीत करु नका, झाडे, प्राणी, पक्षी याव प्रेम करा, असे संदेश सुध्दा लिहले. पक्षी हा महत्वपूर्ण घटक असल्रूाने त्यांचे संगोपन होणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. विद्याथ्याृंनी विद्यालयात पशुपक्षी व चिमण्यांकरिता खाद्य तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यामुळे हजारो पक्षी शालेय परिसरात येवुन आपली तहान व भुक भागवितात. याकरिता गोपाल खाडे यांनी गेल्या अनेक वर्षापासून अथक परिश्रम घेतले.