विठ्ठल गणेश मंडळाच्यावतीने दिव्यांगांना भांडी, फराळ वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 04:13 PM2018-09-17T16:13:21+5:302018-09-17T16:14:11+5:30
श्री विठ्ठल गणेशोत्सव मंडळाच्यावतीने १६ सप्टेंबर रोजी केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ग्रुपच्या दिव्यांग मुलांना भांडी व फराळाचे वाटप त्यांच्या निवाससस्थानी जाऊन करण्यात आले.
पर्यावरणपुरक कार्यक्रमांना प्राधान्य: विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शुक्रवारपेठ भागातील राजगुरु गल्लीतील सुमारे ७० वर्षांची विधायक उपक्रमाची परंपरा लाभलेल्या श्री विठ्ठल गणेशोत्सव मंडळाच्यावतीने १६ सप्टेंबर रोजी केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ग्रुपच्या दिव्यांग मुलांना भांडी व फराळाचे वाटप त्यांच्या निवाससस्थानी जाऊन करण्यात आले. या मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात येत आहे.
मंडळाच्या वतीने दररोज सकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुषांकरीता योग व प्राणायाम शिबीर पतंजली योग समितीचे कोषाध्यक्ष डॉ. भगवंतराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. त्यासोबतच वृक्षारोपण, वृक्षसंर्वन, शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन शिबीर, वृक्षांचे वाटप, मुलांसाठी बौध्दीक स्पर्धा, दिव्यांग वसतीगृहामध्ये फळवाटप, व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबीर, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, चित्रकला व रंगभरण स्पर्धा, रोजगार मार्गदर्शन शिबीर, आरोग्य शिबीर, सामान्य ज्ञान परिक्षा, बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम, संगीत रजनी व नृत्य स्पर्धा व शेवटच्या दिवशी टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक आदी भरगच्च सामाजीक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा १६ सप्टेंबर रोजी मंडळाच्यावतीने केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर यांनी पालकत्व घेतलेल्या दिव्यांग मुलांमुलींना जेवणाची भांडी व फराळाचे वाटप करण्यात आले.