ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 04:00 PM2019-04-03T16:00:38+5:302019-04-03T16:00:53+5:30

वाशिम : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, यासाठी युवक सरसावले असल्याचे आशादायी चित्र समोर येत आहे. रक्ताची अशी नाती जोडण्यासाठी ऐच्छिक रक्तदात्यांचा ‘टक्का’ वाढत आहे. रा

Voluntary blood donation is growing in washim distric | ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढतोय !

ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढतोय !

Next


वाशिम : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, यासाठी युवक सरसावले असल्याचे आशादायी चित्र समोर येत आहे. रक्ताची अशी नाती जोडण्यासाठी ऐच्छिक रक्तदात्यांचा ‘टक्का’ वाढत आहे. राज्यात २०१० मध्ये रक्तसंकलनाचे १०.८६ लाख यूनिटचे प्रमाण २०१८-१९ मध्ये १९ लाख यूनिटवर गेले आहे.
रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचविण्यास पुरेसा ठरू शकतो. रक्तदानासंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात असल्याने रक्तदान मोहिमेला चळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे. एखाद्याला जीवदान देण्यासाठी आता सर्व वयोगटातील नागरिक समोर येत असल्याने साहजिकच रक्तपेढीतील ऐच्छिक रक्तसंकलनात वाढ होत आहे. राज्यात २०१० मध्ये २७३ रक्तपेढीतून १०.८६ लाख युनिट ऐच्छिक रक्तसंकलन झाले होते. १०.८६ लाख युनिट म्हणजे १०.८६ लाख बॅग. अर्थात रक्तदातेही १०.८६ लाख! २०११ मध्ये २८२ रक्तपेढ्यांतून ११.९२ लाख युनिट, २०१२ मध्ये २९१ रक्तपेढ्यांतून १३.२९ लाख युनिट, २०१३ मध्ये ३०० रक्तपेढ्यांतून १३.९० लाख युनिट आणि २०१४ मध्ये ३१० रक्तपेढ्यांतून १४.९२ लाख युनिट रक्तसंकलन झाल्याची नोंद राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या दप्तरी आहे. सन २०१६-१७ मध्ये ३२१ रक्तपेढ्यातून १६.१७ लाख युनिट, सन २०१७-१८ मध्ये ३३१ रक्तपेढ्यातून १७ लाख तर २०१८-१९ मध्ये १८ लाख युनिट रक्तसंकलन करण्यात आले. यामध्ये ऐच्छिक रक्तसंकलनाची टक्केवारी ९० पेक्षा अधिक आहे.
वाशिम जिल्ह्याचा विचार करता सन २०१० मध्ये ३००, २०११ मध्ये ६३१, २०१२ मध्ये १२६५, २०१३ मध्ये १०८०, २०१४ मध्ये २१३७, २०१५ मध्ये २२४७, २०१६ मध्ये २१७१, २०१७ मध्ये २०२५, २०१८ मध्ये २८४८ आणि जानेवारी २०१९ ते ३० मार्च २०१९ या दरम्यान ६१० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
 
 
वाशिम जिल्ह्यात रक्तदानासंदर्भात आरोग्य विभागातर्फे व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. यामुळे रक्तदान मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप येत आहे. युवावर्ग मोठ्या संख्येने ऐच्छिक रक्तदानाकडे वळत आहे. सर्वसामान्य जनतेलादेखील रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
- डॉ. अनिल कावरखे
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम.

Web Title: Voluntary blood donation is growing in washim distric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.