मतदार यादी पुनरीक्षण : १५ डिसेंबरपर्यंत नावात दुरूस्ती करावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 05:22 PM2020-11-28T17:22:32+5:302020-11-28T17:22:39+5:30
Washim News जिल्ह्यात १७ नोव्हेंबर २०२० रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.
वाशिम : मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीमधील नावात दुरूस्ती किंवा आक्षेप असेल तर १५ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयात दाखल कराव्या असे आवाहन जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाने केले.
भारत निवडणूक आयोगाने सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केलेला आहे. जिल्ह्यात १७ नोव्हेंबर २०२० रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. या प्रारुप मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ठ नसतील तसेच १ जानेवारी २०२१ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाºया युवक, युवतींना मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. नावात दुरूस्ती असल्यास किंवा आक्षेप असल्यास १५ डिसेंबरपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. ५ जानेवारीपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. दुसरीकडे प्रारूप मतदार यादीतील मयत झालेल्या, इतरत्र कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी असलेल्या मतदारांनी नाव कमी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.