मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम
By admin | Published: June 7, 2014 10:32 PM2014-06-07T22:32:27+5:302014-06-07T22:53:31+5:30
मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारंजा विधानसभा अंतर्गत स्थानिक तहसील प्रशासनाच्या वतीने ९ ते ३0 जून या कालावधीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे,
कारंजालाड : मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारंजा विधानसभा अंतर्गत स्थानिक तहसील प्रशासनाच्या वतीने ९ ते ३0 जून या कालावधीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार एस.व्ही.उंबरकर यांनी ७ जून रोजी दिली. या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २0१४ रोजी वयाचे १८ वर्ष पूर्ण करणार्या मतदारांचे मतदार यादीत नाव टाकणे, वगळणे, नावात दुरूस्ती व भागाचे स्थलांतर तसेच ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे पण छायाचित्र नाही अशा मतदारांचे छायाचित्र जमा करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय (बीएलओ) यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच प्रारूप मतदार याद्या ९ जून रोजी सर्व मतदान केंद्रावर तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, ९ जून रोजी प्रारूप याद्या प्रसिद्ध करणे, ९ ते ३0 जूनपर्यंत दावे व हरकती दाखल करता येईल. २१, २२, २८ आणि २९ जून रोजी विशेष मोहिम राबविल्या जाणार आहे. १५ जुलै रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहे. २५ जुलै रोजी डाटाबेसचे अद्ययावतीकरण तर ३१ जुलै रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल. (नगर प्रतिनिधी)