मतदार याद्यांमध्ये पुरुष झाले महिला

By admin | Published: November 23, 2015 01:06 AM2015-11-23T01:06:42+5:302015-11-23T01:06:42+5:30

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, यादीत अनेक चुका.

Voter lists men in women | मतदार याद्यांमध्ये पुरुष झाले महिला

मतदार याद्यांमध्ये पुरुष झाले महिला

Next

मालेगाव (जि. वाशिम) : येथे पुढील महिन्यात नगरपंचायतची निवडणूक होणार असून, त्या दृष्टीने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये अनेक चुका असून, अनेक पुरुषांना महिला, तर महिलांना पुरुष करण्यात आले आहे तसेच हिंदूंना मुस्लिम, तर मुस्लिमांना हिंदू करण्यात आले आहे. अनेक मतदारांचे यादीत नाव नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. मालेगाव येथे नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून प्रारूप मतदार याद्या तहसील कार्यालयात प्रसिद्ध झाल्या. नगरपंचायतच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी निघाल्याने राजकीय पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरातील १७ प्रभागांच्या याद्या २0 नोव्हेंबरला प्रभाग रचनेनुसार तयार करण्यात आल्या आहेत. त्या याद्यांनुसार १७,११४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव ध.मा. कानेड यांच्या स्वाक्षरीने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार मतदार यादीसंदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर आहे. मतदार याद्या घेऊन जाणार्‍यांनी शनिवारी नगरपंचायत कार्यालयात गर्दी केली होती. नगरपंचायत अध्यक्ष प्रभाग क्र. ३, प्रभाग क्र.८ व प्रभाग क्र. १३ मधूनच निवडला जाणार असल्याने या प्रभागांकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नगरपंचायतीची सत्ता आपल्याच ताब्यात यावी, याकरिता सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत. शहरातील प्रभाग क्र. ७ मध्ये सर्वांंत कमी मतदार आहेत, तर प्रभाग ८ मध्ये सर्वांंत जास्त १६१५ मतदार आहेत. प्रत्येक प्रभागात चार प्रमुख पक्षांचे उमेदवार, एक उमेदवार आघाडीचा व एक अपक्ष असे मिळून सहा जण निवडणूक रिंगणात असल्यास विजयी उमेदवाराला केवळ १९५ ते १५0 मतदान मिळविणे गरजेचे राहणार आहे.

Web Title: Voter lists men in women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.