शाळा-महाविद्यालयांमध्ये गुंजणार ‘मतदार जनजागृती’चे सूर !

By admin | Published: June 11, 2017 01:58 PM2017-06-11T13:58:31+5:302017-06-11T13:58:31+5:30

शाळा, महाविद्यालयांमध्येदेखील मतदार जागृतीचा जागर केला जाणार आहे.

Voters' awareness in schools and colleges | शाळा-महाविद्यालयांमध्ये गुंजणार ‘मतदार जनजागृती’चे सूर !

शाळा-महाविद्यालयांमध्ये गुंजणार ‘मतदार जनजागृती’चे सूर !

Next

वाशिम : १ जुलै रोजी राज्यभर मतदार दिन म्हणून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या अनुषंगाने पश्चिम वऱ्हाडातील शाळा, महाविद्यालयांमध्येदेखील मतदार जागृतीचा जागर केला जाणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १ जुलै रोजी ह्यराज्य मतदार दिवसह्ण साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी होणाऱ्या पहिल्या राज्य मतदार दिवसाकरिता ह्यमतदार हाच नागरिक जबाबदारह्ण हे घोषवाक्य जाहीर केले आहे. यादिवशी वाशिम जिल्ह्यातील बीएलओ हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील नवीन नोंदणी झालेल्या मतदारांना भारत निवडणूक आयोगाचे घोषवाक्य असलेल्या बॅचेसचे वाटप करणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली. १ जुलै ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत १८ ते २१ वर्षे वयोगटातील पात्र प्रथम मतदारांची नाव नोंदणी करण्यावर भर दिला जाणार आहे. याकरिता शासकीय आणि खाजगी शाळा, कॉलेजमध्ये नाव नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले १ ते ८ नमुन्यातील माहितीचे विश्लेषण करून लोकसंख्या व मतदार यांचे प्रमाण, लिंगगुणोत्तर व वयोगटनिहाय असलेली तफावत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

विशेष मतदार नोंदणी मोहिमेमध्ये ८ जुलै व २२ जुलै २०१७ या दोन दिवशी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरोघरी भेटी देवून जनजागृती करणार आहेत तसेच मतदारांचे विशेषत: १८ ते २१ वयोगटातील युवक-युवतींचे नव्याने मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेला नमुना ६ मधील अर्ज भरून घेणार आहेत. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, नागरी सेवा केंद्रासह पोस्टाद्वारेही नाव नोंदणीसाठी आवश्यक असलेले नमुना ६ मधील अर्ज स्वीकारले जाणार आहेत.  भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या अ‍ॅपद्वारेही नमुना ६ मधील अर्ज भरता येतील. मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव वगळण्याची कार्यवाही विहित पद्धतीने करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: Voters' awareness in schools and colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.