मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम यशस्वी करा

By admin | Published: October 2, 2015 02:13 AM2015-10-02T02:13:00+5:302015-10-02T02:13:00+5:30

वाशिम जिल्हाधिका-यांच्या अधिका-यांना सूचना.

Voters list will be successful in the special brief recruitment program | मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम यशस्वी करा

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम यशस्वी करा

Next

वाशिम : १ जानेवारी २0१६ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादी पुनर्निरिक्षण कार्यक्रम ८ ऑक्टोबर २0१५ ते १६ जानेवारी २0१६ या कालावधीत राबविण्यात येणार असून, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व इतर सर्व संबंधित अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी सांदिपान सानप, तहसीलदार आशिष बिजवल, ए. पी. पाटील, बळवंत अरखराव, अमोल कुंभार, सोनाली मेटकरी, नायब तहसीलदार सुहास मडके यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, १ जानेवारी २0१६ रोजी १८ वर्षे पूर्ण करीत असलेल्या सर्व नागरिकांचे मतदार यादीत नाव नोंदविणे, मतदार यादीतील दुबार, मयत तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट आहे, मात्न ज्यांचे फोटो नाहीत, अशा मतदारांकडून फोटो गोळा करणे तसेच छायाचित्न मतदार ओळखपत्नातील चुका दुरुस्त करून प्रमाणित मतदार याद्या तयार करण्यासाठी हा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, याबाबत सर्व संबंधितांनी नियोजनपूर्वक कार्यवाही करण्याचे सुचविले. ८ ऑक्टोबर २0१५ ते १६ जानेवारी २0१५ या कालावधीत राबविण्यात येणार्‍या मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रमामध्ये ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येणार असून, त्यावर ८ ऑक्टोबर २0१५ ते ७ नोव्हेंबर २0१५ या कालवधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील.

Web Title: Voters list will be successful in the special brief recruitment program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.