वाशिम जिल्ह्यात २७८ ग्राम पंचायतींसाठी मतदानाला सुरुवात
By संतोष वानखडे | Published: December 18, 2022 11:22 AM2022-12-18T11:22:47+5:302022-12-18T11:23:27+5:30
माळेगावात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड : कोठा येथे वाद
वाशिम - ९ ग्राम पंचायती अविरोध झाल्याने २७८ ग्राम पंचायत निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजतापासून ८५४ केंद्रांमध्ये मतदानाला सुरुवात झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ यादरम्यान कार्यकाळ संपलेल्या वाशिम जिल्ह्यातील २८७ ग्राम पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १८ डिसेंबर रोजी होत आहे. दरम्यान ९ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने आता २७८ ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली. ८५४ मतदान केंद्र असून सदस्य पदाच्या ३७५६ आणि सरपंच पदाच्या ९०२ उमेदवारांचे भाग्य मतदारांकडून ईव्हीएममध्ये बंद केले जात आहे.
माळेगावात तांत्रिक बिघाड !
मालेगाव तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत निवडणुक मतदानादरम्यान बुथ क्रमांक ८३ मधिल 'इव्हीएम' बंद पडल्याने तब्बल पाऊण तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. तांत्रीक दोष दुरुस्ती नंतर मतदान सुरळीत सुरू झाले.
कोठा येथे वाद !
मालेगाव तालुक्यातील ग्राम कोठा येथे एका बूथवर विरोधी पॅनलच्या कार्यकर्त्यामध्ये वाद झाल्याची माहिती मिळाली. आणखी गुन्हा दाखल झाला नाही.