रिसोड येथील वृषाली श्रीलंकेत खेळणार क्रिकेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 11:59 AM2021-02-06T11:59:29+5:302021-02-06T11:59:51+5:30

Womens Cricket वृषालीची महिलांच्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली असून ती श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Vrushali of Risod to play cricket in Sri Lanka! | रिसोड येथील वृषाली श्रीलंकेत खेळणार क्रिकेट!

रिसोड येथील वृषाली श्रीलंकेत खेळणार क्रिकेट!

Next


रिसोड : जिद्द, चिकाटी अंगी असेल आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तर कुठलेच काम अशक्य राहत नाही, हे रिसोड येथील सन २०१८ मध्ये आईचे छत्र हरविलेल्या वृषाली इरतकर या मुलीने सिद्ध केले आहे. वृषालीची महिलांच्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली असून ती श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. तिच्या या यशामुळे रिसोडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचा सूर सर्व स्तरातून उमटत आहे.
भारतासह अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन, बांगलादेश आदी देशांमध्ये होणारी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा येत्या ४ ते ८ मार्च या कालावधीत श्रीलंका येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यात भारताकडून प्रतिनिधित्व करीत असलेल्या महाराष्ट्रातील दोन मुलींमध्ये वृषाली इरतकर हिचा समावेश झालेला आहे. वृषालीच्या घरची परिस्थिती हलाखीची असून आई आणि भावाचा सन २०१८ मध्ये एका अपघातात मृत्यू झाला. वडिलांनी मात्र शहरातील बाजारात हातगाडी लावून भाजीविक्रीचा व्यवसाय करीत असताना वृषालीला आईची उणीव भासू दिली नाही. वृषालीनेदेखील प्रचंड मेहनत घेतली आहे. पहाटे चार वाजता झोपेतून उठून ती धावण्याचा सराव करते. पुष्पादेवी कला महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षाला ती शिक्षण घेत आहे. सोबतच वडिलांना हातभार लागावा, यासाठी तिने रिसोड येथेच एका खासगी कार्यालयात नोकरीसुद्धा पत्करली आहे. आठव्या वर्गात असताना तिला शाळेचे शिक्षक सुधीर देशमुख यांनी क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. त्या जोरावर तिने आज चक्क भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात स्थान पटकाविले आहे. 

Web Title: Vrushali of Risod to play cricket in Sri Lanka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.