इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात वढवी शाळेचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:30 AM2021-09-02T05:30:01+5:302021-09-02T05:30:01+5:30

बालवैज्ञानिकांनी तयार केलेल्या विज्ञानाच्या विविध प्रयोगांचे प्रदर्शन देशातील आसाम, दिल्ली, बारामती या ठिकाणी व्हायचे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या भीतीने अनेक ...

Wadhvi School Participates in Inspire Award Exhibition | इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात वढवी शाळेचा सहभाग

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात वढवी शाळेचा सहभाग

Next

बालवैज्ञानिकांनी तयार केलेल्या विज्ञानाच्या विविध प्रयोगांचे प्रदर्शन देशातील आसाम, दिल्ली, बारामती या ठिकाणी व्हायचे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या भीतीने अनेक उपक्रमांवर परिणाम झाला. त्यामुळे देशभरातील बालवैज्ञानिकांचे राष्ट्रीय पातळीवर भरणारे इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन यंदा तंत्रज्ञानाच्या आधारे ४ ते ८ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन भरणार आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकमेव आप्पास्वामी विद्यालय वढवीचा सहभाग राहणार आहे. त्यामुळे शाळेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर विज्ञान प्रयोग यशस्वी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय प्रदर्शनात संधी मिळत असते. गेल्या वर्षी २०१९ ते २० या सत्रात राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन अमरावती येथे घेण्यात आले. यावर्षी कोरोनामुळे ऑनलाईन मेळाव्यात राज्यातील जवळपास पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी एकाच वेळी सहभागी होणार आहेत. या बालवैज्ञानिकांच्या मेळाव्याकरीता पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील एका शाळेची निवड करण्यात आली. त्यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामधील वढवी येथील आप्पास्वामी विद्यालयातील विद्यार्थी अंकुश शेषराव भागवत हा जीव संरक्षण यंत्र सहभाग या प्रयोगाचे सादरीकरण करणार आहे.

जिल्ह्यातील एकमेव मॉडेलची देशपातळीवर निवड होणे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी बाब आहे. या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी ऑनलाईन सहभाग घ्यावा.

अंकुश शेंडोकार,

मुख्याध्यापक आप्पास्वामी विद्यालय वढवी

जिल्ह्यातील एकमेव मॉडेलसाठी कारंजा तालुक्यातील आप्पास्वामी विद्यालय वढवी येथील शाळेची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यामुळे ही शाळा राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ही स्पर्धा ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन होणार आहे.

रमेश तांगडे,

शिक्षणाधिकारी माध्यमिक वाशिम

विदर्भातील १० शाळांचा सहभाग

इन्स्पायर अवार्ड ऑनलाईनकरीता विदर्भातील १० शाळांचा सहभाग आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील आप्पास्वामी विद्यालय वढवी, अमरावती जिल्ह्यातील रामकृष्ण विद्यालय अमरावती, सेक्रेड हार्ट इंग्लिश स्कूल परतवाडा, यवतमाळ जिल्ह्यातील एस.पी. एम. गर्ल्स हायस्कूल घाटंजी, बुलडाणा जिल्ह्यातील चक्रधर स्वामी विद्यालय बुलडाणा, भंडारा जिल्ह्यातील सेनफिटर स्कूल बेला, नागपूर जिल्ह्यातील यशोदा मराठी प्राथमिक स्कूल, वर्धा जिल्ह्यातील सेटजॉन हायस्कूल हिंगणघाट, चंद्रपूर जिल्ह्यातील भांवजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर, ज्ञानगंगा विद्यालय चंद्रपूर या शाळांचा सहभाग आहे.

Web Title: Wadhvi School Participates in Inspire Award Exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.