थांबा... थंड पाणी प्या, मन शांत करा,मगच समोर जा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 04:49 PM2019-05-16T16:49:54+5:302019-05-16T16:50:19+5:30
येथील वयोवृध्द बंडूजी इंगोले यांच्या मुलांनी कारंजा ते मानोरा रोडवरील कुपटा ते दारव्हा रोड नजीकच्या त्यांच्या स्वत:च्या शेतातील विहीरीजवळ पाणपोई उभारली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपटा: उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हाने सर्व जीवांची लाही लाही झाली असुन त्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता व्यावसायीकांनी गावे गावी शुध्द व थंडपाण्याचे आर.ओ.प्लँट लावुन पैसा कमावण्याचा घाट घातला असतानाच येथील वयोवृध्द बंडूजी इंगोले यांच्या मुलांनी कारंजा ते मानोरा रोडवरील कुपटा ते दारव्हा रोड नजीकच्या त्यांच्या स्वत:च्या शेतातील विहीरीजवळ पाणपोई उभारली. त्यावर थांबा, थंड पाणी प्या, मनशांत करा, मगच समोर जा ’ असे फलक लावल्याने रस्त्यावरुन येºजा करणारे प्रवासी आकर्षित होत आहेत. तसेच त्यांच्या या शुध्द व शितजल वाटपाचे कौतूक करताना दिसून येत आहेत.
इंगोले यांचा स्वताचा आर.ओ. प्लँन्ट असून ते गावातील लोकांना पाणी देण्यासोबतच आपणासही समाजाचे काही देणे घेणे लागते हा विचार मनात ठेवत मानोरा कारंजा रोड लगत असलेल्या शेताजवळ पाणपोई १ जानेवारीपासुन सुरु केली आहे. येणाºया जाणाºया लोकांना थांबा, थंड पाणी प्या, मन शांत करा, मगच समोर जा अशी पाटी लावुन येणाºया जाणाºया लोकांना पाणी पिण्याची विनंती केली जात आहे.
धगधगत्या उन्हात प्रवास करणाºया लोकांचे लक्ष सहजच या पाणपोईकडे जाते. त्यामुळे कुपटाकडून दारव्हाकडे जाणारे कारंजा ते मानोरा ,रोडवर जाणारे येणारे खाजगी वाहन धारक थांबतात, त्यामुळे त्यातील प्रवाशीही उतरुन थंडपाणी पिवुन शांत होतात, त्याच प्रमाणे दुचाकी स्वारही थांबुन जातात, एवढेच नव्हे तर एस.टी.बसेस सुध्दा येथे थांबविल्या जाते.त्यातील प्रवाशी सुध्दा येथील थंड पाण्याने आपली तहान भागवितांना दिसून येत आहे. या पानपोईवर सद्यस्थितीत लग्नसराईमुळे दररोज ४० ते ५० कॅन थंड पाणी लागत असल्याची माहिती इंगोले परिवाराकडून मिळाली. या पाणपोईच्या कल्पनेबाबत विचारणा केली असता वडील बंडूजी इंगोले यांनी गरीब परिस्थिती असतानाही आम्हाला शिक्षण देवुन मोेठे केले व नोकरीवर लावले. त्यांची ईच्छा आहे की, आपल्याकडूनही जनतेची काही सेवा घडावी, त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही या पानपोईची सुरुवात केली असल्याचे प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले. या कामी त्यांचे बंधु विठ्ठल इंगोल व वसंता इंगोले यांचे ही सहकार्य असल्याचे त्यांनी याप्रसंगी कथन केले.