२५१ ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षण अहवालाची प्रतीक्षा !
By admin | Published: March 19, 2017 02:41 AM2017-03-19T02:41:31+5:302017-03-19T02:41:31+5:30
वाशिम जिल्ह्यातील स्थिती; ‘परफॉर्मन्स् ग्रॅन्ट’साठी लेखा परीक्षण बंधनकारक.
वाशिम, दि. १८- १४ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गतची ह्यपरफॉर्मन्स् ग्रॅन्टह्ण मिळविण्यासाठी बंधनकारक असलेले ह्यलेखा परीक्षणह्ण अहवाल अद्याप २५१ ग्रामपंचायतींनी सादर केले नाहीत.
१४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जातो. वाशिम जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती आहेत. पहिल्या वर्षी अर्थात २0१५-१६ मध्ये ४९१ ग्रामपंचायतींसाठी बेसिक ग्रँट म्हणून २६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होता. वाशिम तालुक्यातील ८४ ग्रामपंचायती, रिसोड तालुक्यातील ८0 ग्रामपंचायती व मंगरूळपीर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींनी लेखा परीक्षण अहवाल सादर केले आहेत. उर्वरीत मालेगाव, कारंजा व मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण अहवाल पंचायत विभागाला प्राप्त झाले नाहीत. मालेगाव तालुक्यातील ८३, कारंजा तालुक्यातील ९१ व मानोरा तालुक्यातील ७७ अशा एकूण २५१ ग्रामपंचायतींच्या लेखा परीक्षण अहवालाची प्रतीक्षा आहे.
परफॉर्मन्स् ग्रँटसाठी ग्रामपंचायतींचे गत दोन वर्षे कालावधीचे लेखा परीक्षण झालेले असावे व या लेखा परीक्षणाच्या आधारे ग्रामपंचायतींच्या स्वउत्पन्नात मागील वर्षापेक्षा वाढ झालेली असणे आवश्यक आहे. त्या दृष्टिने ग्रामपंचायतींनी कार्यवाही करावी, अशा सूचना केलेल्या आहेत. लेखा परीक्षण अहवाल व स्वउत्पन्नात वाढ यानुसार परफॉर्मन्स् ग्रँट दिली जाणार आहे.
- प्रमोद कापडे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, वाशिम.