पशु लसीकरणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:35+5:302021-07-04T04:27:35+5:30
------- पाइपलाइन नादुरुस्त वाशिम : जीवन प्राधिकरणच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाइपलाइन लिकेज होऊन पाणी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...
-------
पाइपलाइन नादुरुस्त
वाशिम : जीवन प्राधिकरणच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाइपलाइन लिकेज होऊन पाणी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. गुरुवारीही ही समस्या जाणवली. ही पाइपलाइन दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.
--------------
पेरणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेलूबाजार: कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पेरणीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. शुक्रवारी कृषी सहायकांनी शेतमजुरांना टोकण पद्धतीने सोयाबीन पेरणीबाबत मार्गदर्शन केले.
--------------
अनसिंगचे पोलीस पाटील पद रिक्तच
वाशिम : येथील पोलीसपाटलाचे पद गत दोन वर्षांपासून रिक्त आहे. ते भरण्यासंबंधी संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले असून, अनसिंग येथील ग्रामस्थांना विविध महत्त्वाची कागदपत्रे व दाखले मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
--------------
वाशिम-पुसद रस्त्याची अवस्था वाईट
दगड उमरा : वाशिम ते पुसद महामार्गावरील जाभंरूण जहागीर फाट्यानजीक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करीत मार्ग काढावा लागत आहे. याच कारणामुळे या भागात अनेक अपघातही घडले आहेत.
--------------
नवनिर्मित पुलावर पाणी
वाशिम : मानोरा तालुक्यातील शेंदुरजना-मानोरा मार्गावरील देवठाणानजीक असलेल्या नव्या पुलाची उंची रस्त्याच्या तुलनेत कमी झाल्याने या ठिकाणी खड्डा पडून त्यात पाणी साचत आहे.
^^^^^
-------