बीटी बियाण्यांच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 05:07 AM2018-07-15T05:07:44+5:302018-07-15T05:07:49+5:30
राज्यात गतवर्षी बोंडअळीच्या प्रकोपामुळे लाखो हेक्टरवरील कपाशी बाधित झाली होती.
वाशिम : राज्यात गतवर्षी बोंडअळीच्या प्रकोपामुळे लाखो हेक्टरवरील कपाशी बाधित झाली होती. या पार्श्वभूमीवर यंदा बीटी बियाण्यांचा दर्जा तपासण्यासाठी विविध केंद्रांवरील बियाण्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, आता बियाण्यांच्या दर्जाबाबत येणाऱ्या अहवालाची प्रतीक्षा कृषी
विभागाला आहे.
यंदा बाजारात विक्रीसाठी आलेल्या बीटी बियाण्यांची गुणवत्ता पडताळण्यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रक पथकांकडून
बियाण्यांचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. अमरावती विभागातही ही प्रक्रिया पार पाडण्यात आली असून, संकलित नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत.
त्याच्या अहवालानंतर बीटी बियाण्यांची उपयुक्तता आणि गुणवत्तेवर मंथन करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित कंपन्यांच्या बीज उत्पादनाची तपासणीही केली जाणार आहे.
प्रयोगशाळेच्या अहवालानंतर वरिष्ठ स्तरावर याबाबत चर्चा होऊन निष्कर्ष काढण्यात येईल.
- डी. आर. साठे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी, वाशिम