पर्यटनस्थळांच्या विकासाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:06+5:302021-04-18T04:40:06+5:30

00 पोलीस पाटील यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा ! वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ‘ग्राऊंड ...

Waiting for the development of tourist destinations | पर्यटनस्थळांच्या विकासाची प्रतीक्षा

पर्यटनस्थळांच्या विकासाची प्रतीक्षा

Next

00

पोलीस पाटील यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा !

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ‘ग्राऊंड लेवल’वर पोलीस पाटील व सरपंच हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्य करीत असून, मानसिक धैर्य वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

00

कर्जहप्ते परतफेडीस मुदतवाढीची मागणी

वाशिम : गृहउद्योगासाठी विविध फायनान्स कंपन्यांकडून काढलेल्या कर्जाचे हप्ते गतवर्षी लॉकडाऊनमुळे भरता आले नाहीत. आता पुन्हा हीच परिस्थिती येत आहे. फायनान्स कंपन्यांकडून कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा सुरू आहे. कर्जहप्ते परतफेडीस दोन महिने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बचत गटांनी शुक्रवारी केली.

00

रोजगारसेवकांच्या मागण्या प्रलंबित

वाशिम : रोजगार हमी योजनेत कार्यरत ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. मानधनात वाढ नाही तसेच दरमहा पहिल्या आठवड्यात मानधनही मिळत नसल्याने रोजगारसेवकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

00

अचूक बँक खाते सादर करण्याचे आवाहन

वाशिम : समाजकल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शिष्यवृत्ती दिली जाते. अचूक बँक खाते क्रमांक नसल्याने जवळपास १५० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. अचूक बंँक खाते क्रमांक सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

Web Title: Waiting for the development of tourist destinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.