धानोरा-झोडगा रस्ता कामाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:34 AM2021-01-09T04:34:16+5:302021-01-09T04:34:16+5:30
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उंबर्डा बाजार ते झोडगा या रस्त्याचे डांबरीकरण काही वर्षांपूर्वी करण्यात आले. या रस्त्यामुळे धनज बु. तथा ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उंबर्डा बाजार ते झोडगा या रस्त्याचे डांबरीकरण काही वर्षांपूर्वी करण्यात आले. या रस्त्यामुळे धनज बु. तथा कामरगाव येथे जाण्याचे अंतर बरेच कमी झाले; मात्र गेल्या दीड वर्षापूर्वी समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर धानोरा ताथोड ते झोडगा या रस्त्यावर गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांची वर्दळ वाढली. या जड वाहनांमुळे डांबरी रस्त्यावरील डांबर नाहीसे झाले आणि खडी उघडी पडली, तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. यामुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत. रस्त्यावर पायी चालणेही कठीण झाले आहे. तथापि, रस्त्याच्या दुरुस्तीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची त्वरित डागडुजी करण्याची मागणी धानोरा ताथोडसह झोडगा येथील ग्रामस्थांनी केली आहे.