‘नाफेड’च्या केंद्रावर तूर मोजणीची शेतकºयांना प्रतिक्षा

By admin | Published: April 29, 2017 07:14 PM2017-04-29T19:14:50+5:302017-04-29T19:14:50+5:30

शेतकºयांनी तूर भरून आणलेली वाहने बाजार समितीच्या परिसरात उभी असून, मोजमाप होत नसल्याने ट्रॅक्टरचे भाडे गगनाला भिडले आहे.

Waiting for the farmers to count the tire at the center of NAFED | ‘नाफेड’च्या केंद्रावर तूर मोजणीची शेतकºयांना प्रतिक्षा

‘नाफेड’च्या केंद्रावर तूर मोजणीची शेतकºयांना प्रतिक्षा

Next

१५ दिवसांपासून वाहने उभीच: मंगरुळपीर येथे दहा हजार क्विंटल तूर 
मंगरुळपीर -  नाफेडची खरेदी २२ एप्रिलपासून नाफेडची तूर खरेदी बंद झाली असली तरी, जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे नाफेडच्या खरेदी केंद्रावर पंधरा दिवसापासून शेतकऱ्यांनी तूर भरून आणलेली वाहने बाजार समितीच्या परिसरात उभी असून, मोजमाप होत नसल्याने ट्रॅक्टरचे भाडे गगनाला भिडले आहे.
नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली असली, तरी जिल्ह्यातील सहाही शासकीय खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल तूर पडून उभे आहेत. मंगरुळपीर येथे पंधरा दिवसापासून खरेदी केंद्रांवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप केव्हा सुरू होणार, याबाबतची स्थिती अद्याप अधांतरीच आहे. त्यामुळे तुरीच्या मोजमापासाठी जिल्ह्यातील "नाफेड"च्या केंद्रांवर ताटकळत बसण्याची वेळ तूर उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. खरेदी केंद्रांवर उभ्या असलेल्या वाहनांतील तूरीचे मोजमाप "नाफेड"मार्फत केव्हा होणार, असा प्रश्न तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत. हमीदराने "नाफेड" द्वारे तूर खरेदी २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली असल्याने, मंगरुळपीर बाजार परिसरात उभ्या असलेल्या वाहनांतील हजारो क्विंटल तूरीचे मोजमाप अद्याप अधांतरीच आहे. या तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याची प्रतीक्षा करीत शेतकरी अद्यापही खरेदी केंद्रांवर ताटकळत बसले आहेत. शासनाच्या हममीभावानुसार प्रति क्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत होती. जिल्ह्यात वाशिम, अनसिंग, रिसोड, मालेगाव, कारंजा व मंगरूळपीर अशा सहा ठिकाणी खरेदी केंद्रांवर नाफेडद्वारे तूर खरेदी सुरू होती. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असताना, मोजणी मात्र संथगतीने करण्यात आली. तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याची प्रतीक्षा शेतकरी करीत असतानाच २२ एप्रिलपासून नाफेडचीे तूर खरेदी बंद करण्यात आली.

Web Title: Waiting for the farmers to count the tire at the center of NAFED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.