पीक सर्वेक्षणाची शेतकर्यांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 02:17 AM2017-09-11T02:17:44+5:302017-09-11T02:17:56+5:30
आमदार राजेंद्र पाटणी यांनी मानोरा तालुक्यातील इंझोरीसह इतर ठिकाणच्या सोयाबीन मूग, उडीद, पिकांची ५ सप्टेंबर रोजी पाहणी केली. यावेळी सोयाबीन झाडाला शेंगाच दिसल्या नसल्याने शेतकर्यांविषयी चिंता व्यक्त करीत उ पविभागीय अधिकार्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तालुक्यातील सर्व शेतकर्यांच्या पिकांचा सर्व्हे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या; परंतु अद्याप प्रशासनाकडून अशी पीक पाहणी झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: आमदार राजेंद्र पाटणी यांनी मानोरा तालुक्यातील इंझोरीसह इतर ठिकाणच्या सोयाबीन मूग, उडीद, पिकांची ५ सप्टेंबर रोजी पाहणी केली. यावेळी सोयाबीन झाडाला शेंगाच दिसल्या नसल्याने शेतकर्यांविषयी चिंता व्यक्त करीत उ पविभागीय अधिकार्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तालुक्यातील सर्व शेतकर्यांच्या पिकांचा सर्व्हे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या; परंतु अद्याप प्रशासनाकडून अशी पीक पाहणी झाली नाही.
मानोरा तालुक्यात यंदा कमी पाऊस झाला. यामुळे शे तकर्यांनी कशीबशी केलेली पेरणी उलटली. दरम्यान, काही उगविलेल्या बियाण्यांची वाढही झाली, मात्र याच पावसामुळे या उभ्या पिकांना मालधारणाच झाली नाही. त्यातच मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली असून, सद्यस्थितीत उन्हाळ्यासारखे कडक ऊन तापत असल्याने शेतामधील उभी पिके सुकत आहेत. त्यातच सोयाबीनच्या झाडांना शेंगाही लागल्या नाहीत. याबाबत शेतकर्यांच्या तक्रारीनुसार आमदार राजेंद्र पाटणी यांनी भाजपा कार्यकर्ते अजय जयस्वाल उपसरपंच रवी काळेकर, नरेश आसावा, तसेच शेतकरी राधेश्याम ठोक, दामोदर लांडगे, अजनी येथील किशोर चिपडे, गोपाल ठाकरे, ठाकरे आदी शेतकर्यांसह इंझोरीसह मानोरा तालुक्यातील काही शेतकर्यांच्या शेतांना भेटी देऊन पिकाची पाहणी केली. त्यावेळी पीक परिस्थिती बिकट असल्याचे त्यांना दिसले.
त्यामुळे आमदार पाटणी यांनी कारंजा-मानोराच्या उ पविभागीय अधिकार्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधना आणि इंझोरीसह मानोरा तालुक्यातील पिकांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या; परंतु अद्यापही संबंधित प्रशासनाकडून या पीक पाहणीला सुरुवात करण्यात आली नाही.
जिल्हाधिकार्यांकडून परिस्थितीचा आढावा
जिल्ह्यात यंदा अवर्षणामुळे खरिपातील पिके संकटात सा पडली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याचेही प्रकार घडले असून, पाण्याअभावी पिके सुकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाकडून पीक पाहणी करण्याबाबत किंवा सर्वेक्षणाबाबत अद्याप निर्देश नसले, तरी जिल्हा प्रशासन मात्र परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी वारंवार पीक परिस्थितीचा आढावा घेत असून, कारंजाच्या उपविभागीय अधिकार्यांनीही तहसीलदारांशी या संदर्भात चर्चा करून वरिष्ठांना वेळोवेळी माहिती पाठविण्याच्या सूचना केल्याचे कळले आहे.
उपविभागीय अधिकार्यांनी पीक परिस्थितीबाबत आ पल्याशी चर्चा केली असून, मानोराच नव्हे, तर आमच्या कारंजा तालुक्यातील पीक परिस्थितीबाबत वरिष्ठांना वारंवार माहिती द्यावी लागेल, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
- सचिन पाटील, तहसीलदार कारंजा