दुर्धर आजारग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:43 AM2021-03-27T04:43:09+5:302021-03-27T04:43:09+5:30

वाशिम : हृदयरोग, किडनी व कर्करोग आदी दुर्धर आजाराने पीडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरीता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्रत्येकी १५ हजाराचे ...

Waiting for help from the terminally ill | दुर्धर आजारग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

दुर्धर आजारग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

Next

वाशिम : हृदयरोग, किडनी व कर्करोग आदी दुर्धर आजाराने पीडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरीता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्रत्येकी १५ हजाराचे अर्थसहाय्य दिले जाते. सन २०२० मध्ये २७ प्रस्ताव मंजूर झाले असून संबंधितांना मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

................

‘त्या’ अधिनियमाच्या अंमलबजावणी मागणी

वाशिम : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगत्व तपासणी, मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी मार्गदर्शक सुचनांची अंमलबजवणी करण्यात यावी, अशी मागणी येथील दिव्यांग लाभार्थींनी शुक्रवारी केली.

............

जऊळका येथे आरोग्य तपासणी

वाशिम : जऊळका येथे कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यानुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यासोबतच आरोग्य विभागाने गुरूवारी गावात नागरिकांची आरोग्य तपासणी केली.

००००

तिबल सीट प्रवास; दंडात्मक कारवाई

वाशिम : दुचाकीवरून तिबल सीट प्रवास करणाऱ्या जवळपास ६३ जणांवर गत दोन दिवसांत वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन व जिल्हा वाहतूक शाखेच्या चमूने दंडात्मक कारवाई केली.

...................

स्मशानभूमींसाठी निधीची प्रतीक्षा

वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अतिरिक्त निधी मिळाल्यास स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. १५ कोटींचा अतिरिक्त निधी केव्हा मिळणार, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

..............

मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष

वाशिम : कोरोनाचा आलेख वाढत असताना चहाच्या टपऱ्यांवर घोळका करून बसणारे अनेकजण मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या जवळपास ४२ जणांवर शहर वाहतूक शाखेने गत दोन दिवसांत दंडात्मक कारवाई केली आहे.

..................

कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या!

वाशिम : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस बळावत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कुठलीच हयगय न बाळगता कोरोनापासून बचावासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले.

...............

३० एस.टी. बसेस झाल्या जुनाट

वाशिम : वाशिमसह रिसोड, कारंजा व मंगरूळपीर आगार मिळून जिल्ह्यात १८९ बसेस आहेत. त्यापैकी जवळपास ३० बसेस १० वर्षांपूर्वी आगारात दाखल झाल्या असून त्या सध्या जुनाट झाल्या आहेत. एस.टी. मध्येच बंद पडण्याचे प्रकार यामुळे वाढले आहेत.

..................

मेडशी परिसरात वर्गखोल्या नादुरूस्त

वाशिम : मेडशीसह मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास ४० ते ५० वर्गखोल्या नादुरूस्त आहे. दुरूस्ती करण्याची मागणी पालकांनी यापूर्वीही केली होती. मेडशी परिसरातील वर्गखाल्यांच्या दुरूस्तीसाठी अद्याप निधी मिळाला नाही.

.....................

किन्हीराजा परिसरात पाणीटंचाईचे सावट

किन्हीराजा : उन्हाळ्याला सुरूवात होत नाही; तेच किन्हीराजा परिसरातील गावांमघ्ये पाणीटंचाईचे सावट आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोेरे जावे लागत आहे.

......................

केनवडमध्ये वाहनचालकांची गैरसोय !

वाशिम : केनवड परिसरातील ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्यांची डागडूजी अद्याप केली नाही. रस्त्यावरील खडयांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे.

.................

शिरपूरात हळद विक्रीसाठी बाजारपेठेचा अभाव

वाशिम : शिरपूर व परिसरात हळद उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. असे असताना हळद खरेदी व विक्री व्यवहारासाठी परिसरात बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

..................

आॅफलाईन पद्धतीने रेशन वितरणाची मागणी

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ई-पास मशीनवर अंगठा न घेता आॅफलाईन पद्धतीने रेशन धान्य वितरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी लाभार्थींसह दुकानदारांनी शुक्रवारी पुरवठा विभागाकडे केली.

.................

अर्थसहाय्य मिळण्याकडे कलावंतांचे लक्ष

वाशिम : कोरोना महामारीत सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने लोककलावंतांना कोणतेही सरकारी किंवा खासगी काम मिळाले नाही. शासन याबाबत काय भूमिका घेते, अर्थसहाय्य मिळणार का, याकडे लोककलावंतांचे लक्ष लागून आहे.

....................

दीड हजारांवर नागरिक अनुदानापासून वंचित

वाशिम : ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील दीड हजारावर नागरिकांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान अद्याप मिळालेले नाही.

...................

सुविधा उपलब्ध करण्याची मागणी

वाशिम : तालुक्यातील अनेक गावांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतची कामे अपूर्ण आहेत तर काही ठिकाणी या कामांची प्रतीक्षा आहे. दलित वस्तींमध्ये सुविधा उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी गुरूवारी पंचायत समितीकडे केली.

......................

धूर फवारणी करण्याची मागणी

वाशिम : ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डास प्रतिबंधक धुर फवारणी करणे गरजेचे आहे. याकडे जऊळका जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी शुक्रवारी केली.

........................

नुकसानभरपाई मिळण्याची मागणी

मालेगाव : १९ ते २१ मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीटीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. यासंबंधीचे अहवाल प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आले. भरपाई विनाविलंब मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

.......................

बांधकाम साहित्याच्या किंमतीत वाढ

वाशिम : बांधकाम साहित्याच्या किंमतीत वाढ झाल्याने घरकुल, शौचालयांयासह अन्य प्रकारची बांधकामे करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. शासनाने या योजनेंतर्गतचे अनुदान वाढवावे, अशी मागणी लाभार्थींमधून होत आहे.

.................

पशुसंवर्धन विभागात वर्ग दोनची पदे रिक्त

वाशिम : पशूसंवर्धन विभागातील डॉक्टरांच्या रिक्त पदांचे ग्रहण पशूपालकांना आर्थिक संकटात ढकलत असल्याचे वास्तव आहे. श्रेणी एक व दोनच्या दवाखान्यातील तब्बल २३ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

Web Title: Waiting for help from the terminally ill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.