नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:47+5:302021-03-08T04:38:47+5:30
शासनाने राज्यातील थकित कर्जदार शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. थकित कर्जदार असलेल्या लाखो शेतकऱ्यांचे दोन ...
शासनाने राज्यातील थकित कर्जदार शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. थकित कर्जदार असलेल्या लाखो शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे थकित कर्ज या योजनेत माफही करण्यात आले. शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा करतानाच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊ, असे शासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तथापि, वर्ष उलटले तरी याची अंमलबजावणी शासनाने केली नाही. त्यात मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथून नजीकच असलेल्या वाघी बु. येथील ९० टक्के शेतकरी नियमित पीककर्ज भरणा करीत असतात. त्यामुळे शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयाचे अनुदान तात्काळ द्यावे, अशी मागणी या शेतकऱ्यांमार्फत बाळासाहेब वाघ यांनी केली आहे.