कारंजा येथील डाक विभागाला स्वतंत्र जागेची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:27 PM2018-06-25T14:27:04+5:302018-06-25T14:28:31+5:30
कारंजा लाड - कारंजा शहरातील भारतीय डाक विभागाला अद्याप स्वतंत्र जागा उपलब्ध न झाल्याने भाड्याच्या इमारतीतूनच कामकाज चालत आहे. गत ५० वर्षांपासून डाक कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहे.
कारंजा लाड - कारंजा शहरातील भारतीय डाक विभागाला अद्याप स्वतंत्र जागा उपलब्ध न झाल्याने भाड्याच्या इमारतीतूनच कामकाज चालत आहे.
गत ५० वर्षांपासून डाक कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. आतापर्यंत शहरातील विविध ठिकाणी डाक विभागाने आपले कार्यालय थाटले आहे.परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शासनाकडून शासकीय कार्यालयांसाठी जागा आरक्षीत केली जाते. त्यानुसार कारंजा नगर पालिकेने दिल्ली वेशीच्या बाहेर पोस्टासाठी जागा आरक्षीत केली होती. परंतू भुखंड माफीयाच्या चालाकीने हा भाग निवासी क्षेत्र म्हणुन जाहीर झाले. संबधितांने या जागेवर टिनाचे कुंपनही केले. त्यामुळे पोस्टाच्या जागेसाठी भंटकती सुरू आहे. केंद्र शासनाचे दोन्ही उपक्रम रेल्वे आणि डाक विभाग उपेक्षीत राहीले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व केंद्र शासनाचे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तविक कारंजा शहराच्या सभोवताल शासकीय भुखंड मोठया प्रमाणात आहेत. कोणत्याही भुखंडावर ही ईमारत उभी राहु शकते. परंतू याबाबत कुणी पुढाकार घेतला नाही. जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून खासदार भावना गवळी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी डाक विभागाच्या ग्राहकांकडून होत आहे.