जामदरा तलावाच्या दुरुस्तीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:12+5:302021-02-27T04:55:12+5:30
--------- नियमांच्या पालनाचे आवाहन इंझोरी: जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना इंझोरीत नियमांचे पालन करून उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवली जातात. ...
---------
नियमांच्या पालनाचे आवाहन
इंझोरी: जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना इंझोरीत नियमांचे पालन करून उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवली जातात. ग्रामपंचायतने ही बाब गंभीरपणे घेत व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन शुक्रवारी केले.
------
उंबर्डा येथे कोरोना चाचणी
उंबर्डा बाजार: गेल्या ३ दिवसात ७ जणांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले. त्याची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने गावातील ज्येष्ठ व दुर्धरआजारग्रस्त व्यक्तींची कोरोना चाचणी सुरू केली आहे.
----------
कामरगावात आणखी चार बाधित
कामरगाव: कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरूच असून, कामरगाव येथेही कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळत आहेत. त्यात गुरुवारी गावातील आणखी चार व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले.
---------
'कन्टेनमेंट झोन'ची अंमलबजावणी
इंझोरी: परिसरातील गावात दरदिवशी कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या असून, बाधितांचा परिसर 'कन्टेनमेंट झोन' जाहीर करण्याची अंमलबजावणी परिसरात सुरू आहे.
-------------
चेकपोस्टवर २४ तास पहारा
उंबर्डा बाजार: कारंजा तालुक्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता तहसीलदारांनी जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट सुरू केल्या आहेत. त्यात कारंजा-दारव्हा मार्गावरील सोमठाणा चेकपोस्टवर कर्मचाऱ्यांचा २४ तास पहारा आहे.
--------------
समृद्ध गाव स्पर्धेची कामे थांबली
उंबर्डा बाजार: परिसरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी असलेल्या गावांत खबरदारी म्हणून या स्पर्धेची कामे थांबविण्यात आली आहेत. त्याचा परिणाम कामगिरीवर होणार आहे.