२७0 कर्जदार शेतक-यांना सावकारी कर्जमाफीची प्रतीक्षा
By admin | Published: October 19, 2015 01:28 AM2015-10-19T01:28:34+5:302015-10-19T01:28:34+5:30
रिसोड तालुक्यात आठ परवानाधारक सावकार, २६.७३ लाखांचे कर्ज.
विवेकानंद ठाकरे/ रिसोड (जि. वाशिम) : तालुक्यातील २७0 कर्जदार शेतकर्यांना रिसोड तालु क्यातील आठ परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ होण्याची प्रतीक्षा आहे. या शेतकर्यांवर २६.७३ लाखांचे कर्ज आहे. २0१४ मध्ये कोरडा दुष्काळ पडला होता. या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने परवानाधारक सावकारांकडून घेतलेले शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाप्रमाणे सहकार विभागाने कर्जमाफीप्रकरणी अंमलबजावणी सुरू केली. रिसोड तालुक्यामध्ये आठ अधिकृत सावकार असून, एकूण २७0 कर्जदार शेतकर्यांनी कर्ज घेतल्याची नोंद सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या दप्तरी आहे. परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेल्या व ३0 नोव्हेंबर २0१४ रोजी येणेबाकी असलेल्या शेतकर्यांच्या कर्ज प्रकरणाची तपासणी तलाठय़ांमार्फत सुरु आहे. कर्जाच्या परिस्थीतीबाबत आढावा घेणे सुरु आहे. शे तकरी आहे की नाही याबाबत आधारकार्ड व इतर कागदपत्रांची तपासणी तलाठय़ांकडून सुरू आहे. शेतकर्यांनी शेतीसाठीच कर्ज घेतले होते का, याचीही तपासणी सुरू आहे. शेतकर्यांनी कर्जापोटी सावकारांकडे तारण ठेवलेल्या बाबी परत दिल्याचे हमीपत्र मिळाल्यानंतरच सावकाराला कर्ज व व्याजाची रक्कम शासन देणार आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याने कर्जदार शे तकर्यांना दिलासा मिळणार आहे.