पाऊले चालती पंढरीची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:28 AM2021-07-20T04:28:11+5:302021-07-20T04:28:11+5:30
-किसन झाटे, वारकरी, वांगी .......... आषाढी एकादशीनिमित्त मी २० वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायदळ वारीत जात आहे. कोरोनामुळे या ...
-किसन झाटे, वारकरी, वांगी
..........
आषाढी एकादशीनिमित्त मी २० वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायदळ वारीत जात आहे. कोरोनामुळे या वर्षीही आषाढी एकादशीला माउलीचे दर्शन होणार नाही, याची खंत वाटत आहे. तेथे कीर्तन ऐकणे, चंद्रभागेत स्नान करणे आणि रिंगण सोहळ्याचे व विठ्ठलाचे दर्शन यासारखा आनंद दुसरा काही नाही. या वर्षी गावातच घरी राहून आषाढी उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न राहील, परंतु पंढरपूरची वारी निराळीच आहे. घरी बसून या वर्षी आषाढी उत्सव साजरा करू.
-गजानन महाराज शिंदे
.......
भागवत धर्माच्या आध्यात्मिक परंपरेमध्ये संतांनी आपले जीवन समर्पित केले आहे. एवढी मोठी भक्तीची परंपरा लाभलेल्या वैष्णवांच्या वारीच्या निमित्ताने आषाढी एकादशीला सर्व संतांची मांदियाळी पंढरीला अवतरते, परंतु गत दाेन वर्षांपासून कोरोनामुळे या संतांच्या मांदियाळीला मुकावे लागणार असल्याचे दु:ख आहे. पंढरपूरला जाऊनच प्रार्थना करण्यापेक्षा घरी बसून प्रार्थना केल्या जाताल. शेवटी कण कण में है भगवान!
-दत्ता घायाळ
.........
गत १४ वर्षांपासून मी पंढरपूरची अविरत वारी करीत आहे, तसेच माझ्या श्री संत ज्ञानेश्वर माउली वारकरी शिक्षण संस्थेतर्फे अनेक बालकांना वारकरी प्रशिक्षण देत आहे. अनेक जण वारीसाठी दरवर्षी उत्सुकत असतात. दरवर्षी या वारीचे न चुकता नियोजन केल्या जाते, परंतु या वर्षी कोरोनामुळे वारी करण्याचा योग येणार नाही. तरीही शिक्षण संस्थेमध्ये आषाढी उत्सव साजरा करून विठुरायाचरणी या संकटातून वाचण्याकरिता नागरिकांना बळ देण्याची प्रार्थना करण्यात येणार आहे.
-शिवशंकर भाेयर
...........
आषाढी एकादशी निमित्त ३० वर्षांपासून कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनाकरिता जातो. पायदळवारीत जाण्याची इच्छा आहे, परंतु शक्य होत नसल्याने वाहनाने जातो व वारी पूर्ण करतो. वारी पूर्ण केल्यानंतर जो आनंद मिळतो, तो निराळाच. दरवर्षी नित्यनेमाने त्याचे नियोजन असते, परंतु या वर्षी वारीला मुकावे लागले, तरी सामाजिक दायित्वाचे भान ठेऊन विठू माउलीच्या कृपेने याही वर्षी घरूनच दर्शन घेऊ.
-रतन महाराज अढाव
.........
आषाढी एकादशीनिमित्त मी १० वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायदळ वारीत जात आहे. कोरोनामुळे या वर्षी आषाढी एकादशीला माउलीचे दर्शन होणार नाही, याची खंत वाटत आहे. तेथे कीर्तन ऐकणे, चंद्रभागेत स्नान करणे आणि रिंगण सोहळ्याचे व विठ्ठलाचे दर्शन यांसारखा आनंद दुसरा काही नाही. या वर्षी गावातच घरी राहून आषाढी उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न राहील, परंतु पंढरपूरची वारी निराळीच आहे. घरी बसून या वर्षी आषाढी उत्सव साजरा करू.
-साेपान महाराज सानप