मानोरा तालुक्यात सौभाग्य योजनेची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:15 PM2019-01-30T15:15:29+5:302019-01-30T15:15:42+5:30

मानोरा (वाशिम) : दारिद्र्यरेषेखालील तसेच गोरगरीब कुटुंबाच्या घरी वीजजोडणी देण्यासाठी सौभाग्य योजना राबविली जात आहे. मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व दापुरा या दोन उपकेंद्रांच्या अपवाद वगळता उर्वरीत कुटुंबांना अद्याप वीजजोडणी मिळाली नाही.

Waiting for Saubhagy scheme in Manora taluka | मानोरा तालुक्यात सौभाग्य योजनेची प्रतिक्षा

मानोरा तालुक्यात सौभाग्य योजनेची प्रतिक्षा

googlenewsNext

-  बबन देशमुख

मानोरा (वाशिम) : दारिद्र्यरेषेखालील तसेच गोरगरीब कुटुंबाच्या घरी वीजजोडणी देण्यासाठी सौभाग्य योजना राबविली जात आहे. मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व दापुरा या दोन उपकेंद्रांच्या अपवाद वगळता उर्वरीत कुटुंबांना अद्याप वीजजोडणी मिळाली नाही.
केंद्र शासनाने ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, सौभाग्य’ या नावाने सन २०१७ मध्ये ही योजना कार्यान्वीत केली. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील गोरगरीब कुटूंबाच्या घरी मोफत वीज जोडणी केली जाणार आहे. विज जोडणी नसणाºया  ग्राहकांनी या योजनेचा फायदा  घ्यावा, यासाठी  मानोरा तालुक्यात जनजागृतीही करण्यात आली.   तथापि, तालुक्यातील ७७ गावे या योजनेपासुन अद्याप वंचित असल्याचे समोर आले आहे. मानोरा  पंचायत समितीच्या माध्यमातुन ग्राम पंचायतींनी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे ७ फेबुवारी २०१८ रोजी वीजजोडणी नसणाºया  घरांची यादी   पाठविली. आता एक वर्षाचा कालावधी उलटत आहे. परंतू, अद्याप या कुटुंबांना वीजजोडणी मिळाली नाही. यामध्ये अभईखेडा येथील ४७ कुटुंब याप्रमाणे आमदरी येथील १६, आमकिन्ही ४७, आमगव्हाण ४३, आसोला ३१, आसोला खु २८३, अजनी २७, भिलडोंगर ११०, भोयणी २७, भुली १२४, बोरव्हा ९५, चौसाळा ५४, चोंडी ७९, दापुरा बु. १७, दापुरा खु. १८, देऊरवाडी ७४, देवठत्तणा ३४,  धानोरा ६५, ढोणी ५८, धावंडा १८, इंझोरी २१, एकलारा ७६, फुलउमरी ८३,  गादेगाव ३४५, गव्हा ६६, गिर्डा १४, गिरोली ९०, गोंडेगाव ३५, हळदा ५६, हातना ३१, हातोली १३, कारपा १८०, खांबाळा १०२, कोलार ५५, कुपटा, ३, माहुली ४५, म्हसनी ३७, मोहगव्हाण ८७, पंचाळा ११८, पाळोदी ६१, पारवा ३६, पोहरादेवी ८१६, रतनवाडी १३२ , रोहणा १०२ , रुद्राळा ४६, सावळी २३, सेवादासनगर ६२, शेंदोना १६५, शेंदुरजना १०९, सोयजना १३४, सोमनाथनगर १४३, सोमठाणा ५०, तोरणाळा ३०, उमरी बु. १२१, वापटा २०३, वसंतनगर, ५०, वटफळ १८५, विठोली १०८, वाईगौळ १४९, अशी गावनिहाय कुटुंब संख्या आहे. मानोरा तालुक्यातुन शेकडो विज जोडणीची मागणी असताना, अद्याप महावितरणकडून कोणतीही कार्यवाही नसल्याने गोरगरीब कुटुंबांमधून रोष व्यक्त होत आहे. तालुक्यातील पोहरादेवी व दापुरा या दोन उपकेंद्रांच्या अपवाद वगळता उर्वरीत गावांना सौभाग्य योजनेंतर्गतच्या वीजजोडणीची प्रतिक्षाच आहे. 


सौभाग्य योजने अंतर्गत मानोरा तालुक्यातील पोहरादेवी, दापुरा या दोन सेंटरमधील काही गावामध्ये वीज जोडणी नसणाºया घरांमध्ये विजजोडणी केली आहे. उर्वरीत गावांमध्ये वीजजोडणी केल्या जाईल.
- विलास वाघ
उपकार्यकारी अभियंता,
महावितरण, मानोरा

Web Title: Waiting for Saubhagy scheme in Manora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.