कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरीच्या अनुदानाची प्रतिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 05:46 PM2019-04-08T17:46:30+5:302019-04-08T17:49:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरींचे बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदानाची प्रतिक्षा ...

Waiting for the subsidy for the agriculture Swavalamban scheme! | कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरीच्या अनुदानाची प्रतिक्षा !

कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरीच्या अनुदानाची प्रतिक्षा !

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरींचे बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदानाची प्रतिक्षा आहे. विहिर बांधकामानंतर पहिल्या टप्प्यातील अनुदान देण्याची मागणी लाभार्थी शेतकऱ्यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील शेतकºयांच्या शेतीला सिंचनाची जोड मिळावी याकरीता विहिरी व सिंचन साहित्याचा लाभ दिला जातो. एका लाभार्थीला जवळपास २.८० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळत असून, सन २०१८-१९ या वर्षात कृषी स्वावलंबन योजनेसाठी जिल्ह्याला १५ कोटी १५ लाख रुपये एवढा निधी प्राप्त झालेला आहे तर क्रांतीवीर बिरसा मुंडा योजनेसाठी ५२ लक्ष ४६ हजार रुपये अनुदान जिल्हा नियोजन समितीने मंजूर केले आहे. या दोन्ही योजनांसाठी जानेवारी महिन्यातच लाभार्थींची निवड करण्यात आली. मालेगाव व रिसोड तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा अपवाद वगळता उर्वरीत तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिर बांधकामाचे कार्यारंभ आदेशही दिले होते. त्यानंतर मार्च महिन्यात रिसोड व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश मिळाले. त्या-त्या टप्प्यातील विहिर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेतकºयांना अनुदान मिळणे अपेक्षित होते. अर्ध्याअधिक शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही.

Web Title: Waiting for the subsidy for the agriculture Swavalamban scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.