वाशिम जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 04:12 PM2019-04-07T16:12:47+5:302019-04-07T16:12:56+5:30

वाशिम : जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. अद्याप टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी मिळाली नसल्याने टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.

Waiting for tanker villages in Washim district! | वाशिम जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षा !

वाशिम जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षा !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. अद्याप टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी मिळाली नसल्याने टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.
गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नसल्याने यावर्षी जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात  तीन मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांतही सध्या अपेक्षीत जलसाठा नसल्याने पाणीटंचाईची तिव्रता वाढत आहे. ५० पेक्षा अधिक प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर अनेक गावातील विहिरी आणि कूपनलिकांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या ४.३८ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत तहसीलस्तरावर पाठविण्यात येत आहेत. विहिर अधिग्रहणासंदर्भात ८० पेक्षा अधिक प्रस्ताव आहेत तर टँकरसंदर्भात १५ प्रस्ताव आहेत. विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात झाली नाही. परिणामी, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासंदर्भात प्रचंड गैरसोय होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात यंत्रणा गुंतलेली असल्याने पाणीटंचाई निवारणार्थच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे. टँकरच्या प्रस्तावांना अद्याप मंजूरी मिळालेली नसल्याने टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँकरची प्रतीक्षा कायम आहे. टँकरने पाणीपुरवठा नसल्याने पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी गावकºयांना मैलभर पायपिट करावी लागत आहे. टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी द्यावी, अशी मागणी टंचाईग्रस्त गावातील नागरिकांमधून होत आहे.
 
गलमगाव येथे पाण्यासाठी झूंबड
मानोरा तालुक्यातील गलमगाव येथे सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाणीपुरवठा करणारी विहिर कोरडी पडल्यामुळे गावातील एका हातपंपावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासंदर्भात ग्रामपंचायतने वरिष्ठांकडे सादर केलेला प्रस्ताव लालफितशाहीत अडकला आहे. हा प्रस्ताव पंचायत समितीमधून तहसिल प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अद्याप प्रस्ताव मंजूर झाला नसल्याने गावकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याप्रमाणेच राजूरा परिसरातील राजूरा, खैरखेडा, रिसोड तालुक्यातील करंजी आदी गावांमध्येही तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.

Web Title: Waiting for tanker villages in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.