शिक्षकांना बदली पोर्टल सुरू होण्याची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 02:04 PM2019-05-31T14:04:04+5:302019-05-31T14:04:11+5:30

बदली पोर्टल सुरू झाले नसून, शिक्षकांची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया प्रलंबितच आहे.

Waiting for teachers transfer portal | शिक्षकांना बदली पोर्टल सुरू होण्याची प्रतिक्षा

शिक्षकांना बदली पोर्टल सुरू होण्याची प्रतिक्षा

googlenewsNext

लोाकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेचे पोर्टल सुरु करण्याच्या सुचना सर्व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तथापि, बहुतांश जि.प. अंतर्गत पदनिहाय व क्षेत्रनिहाय अंतिम बदलीपात्र शिक्षक याद्यांसह इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे बदली पोर्टल सुरू झाले नसून, शिक्षकांची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया प्रलंबितच आहे.
जि. प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी बदली पोर्टल सुरू करण्यापूर्वी पदनिहाय व क्षेत्रनिहाय अंतिम बदलीपात्र शिक्षक यादी प्रसिद्ध करण्यासह बदली पोर्टल वर सर्व शिक्षकांची टीयूसी व नॉन टीयूसी अपडेट करने, रिक्त असणारी पदनिहाय जागा प्रसिध्द करणे व त्या रिक्त जागा बदली पोर्टल वर अपडेट करणे, समानीकरणाच्या जागा प्रसिध्द करून बदली पोर्टल वर अपडेट करणे आवश्यक असून, ही प्रक्रि या पूर्ण करण्यात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वत:चा मोबाईल क्रमांक बदली पोर्टलवर अपडेट करू शकणार आहेत; परंतु बहुतांश जि.प. अंतर्गत उपरोक्त प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून, यात पश्चिम वºहाडातील जिल्हा परिषदांचा समावेश आहे. आता बदल्यांचा चेंडू मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कोर्टात आहे. जेवढ्य ालवकर त्यांची बदली संदर्भात कामे उरकतील तेवढ्या लवकर बदली पोर्टल सुरू होईल. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी बदली पोर्टल सुरू होण्यासंदर्भात सूचना देतील. जिल्हानिहाय बदली पोर्टल सुरू होण्याच्या तारखा वेगवेगळ्या असू शकतात. आता बदली पोर्टल सुरू करने व बंद करणे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या अधिनस्थ असलेल्या शिक्षण विभागाच्या पूर्ण टीमच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे.
 

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत याद्या प्रसिद्ध करण्यासह इतर काही कामे आटोपत आली आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी बदली पोर्टल सुरू करतील आणि ते पोर्टल कधीपर्यंत सुरू राहिल. याची माहिती सर्व शिक्षकांना दिली जाईल.
-अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि.प. वाशिम

Web Title: Waiting for teachers transfer portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.