'मिनी मॅरेथॉन’मध्ये धावले वाशिम कर !
By admin | Published: January 25, 2017 10:47 AM2017-01-25T10:47:51+5:302017-01-25T10:47:51+5:30
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांमध्ये लोकशाही विषयी जनजागृती करण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासन व विविध स्वयंसेवी संस्थांच्यावतीने २५ जानेवारी रोजी ‘वाशिम मिनी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले.
Next
वाशिम, दि. 25 - राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांमध्ये लोकशाही विषयी जनजागृती करण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासन व विविध स्वयंसेवी संस्थांच्यावतीने २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता ‘वाशिम मिनी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो वाशिमकर धावले .
‘रन फॉर डेमोक्रसी’ हे ब्रीद वाक्य असलेल्या या मिनी मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील महिला व पुरुषांनी सहभाग दर्शविला होता .
‘वाशिम मिनी मॅरेथॉन’ची सुरुवात सकाळी ७ वाजता वाशिम पोलीस कवायत मैदान येथून झाला . या मिनी मॅरेथॉनमध्ये इतर जिल्ह्यातील स्पर्धकांचाही सहभाग दिसून आला .
मिनी मॅरेथॉनमध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह उपविभागीय अधिकारी , तहसीलदार , क्रीडा अधिकारी , जिल्हा समन्वयक , स्वयंसेवी संघटना समन्वयक मनीष मंत्री, शासकीय - निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा सहभाग लाभला .