शंभरी गाठलेल्या वाशिम पोस्टाची बँकिंग क्षेत्राकडे वाटचाल
By Admin | Published: October 9, 2016 01:41 AM2016-10-09T01:41:50+5:302016-10-09T01:41:50+5:30
एटीएमकार्ड, इ-मनिऑर्डर सेवा; पाच वर्षात वीस कोटींची उलाढाल.
शिखरचंद बागरेचा
वाशिम, दि. 0८- संपूर्ण देशात शहरी व ग्रामीण भागात नागरिकांचे संदेश पत्र आणि तार द्वारे जलदगतीने पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या टपाल खात्याने बदलत्या काळानुसार कात टाकून अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या सहाय्याने कोट्यवधींची उलाढाल करणा-या वाशिम पोस्ट ऑफीस कार्यालयाने शंभरी गाठताना बॅकींग क्षेत्राकडे वाटचाल सुरु केली आहे. अशी माहिती पोस्टमास्तर के.एस.नायक यांनी जागतिक टपाल दिनानिमितत प्रस्तृत प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
ब्रिटीश शासनाच्या काळात वाशिम जिल्हा अस्तित्वात असतानाच वाशिम येथे टपाल खाते सुरु झाले होते. सध्याचे वाशिम टपालखात्याची सध्याची जी इमारत अस्तित्वात आहे. या इमारतीमध्ये सन १९१८ पासून पोस्ट खात्याचे कामकाज सुरु झाले. सन १९९८ मध्ये उपग्रहामार्फत मनिऑर्डर सुविधा, बहुउपयोगी संगणकसेवा व स्पीड पोस्टाची सुरुवात झाल्यानंतर बदलत्या काळानुसार इलेक्ट्रॉनिक (मनिऑर्डर) व एटीएम कार्डाच्या माध्यमाने बँकींग क्षेत्राकडे वाटचाल सुरु केली आहे. मागील पाच वर्षात वाशिमच्या टपाल खात्याने तब्बल वीस कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. बचत खाते, रिकरिंग खाते व रोजगार हमी खाते ३३ हजार खातेदारांचे दैनंदिन व्यवहारासोबत वाशिम टपालखात्या अंतर्गत १९ खेडे विभागात टपाल खात्याच्या शाखा सेवा पुरवित आहेत. सुकन्या, समृध्दी योजना परदेशातून रक्कम बोलावणे, डाक जीवन बिमा योजना, किसान विकास पत्र, राष्ट्रीय विकास पत्र, मासिक प्राप्ती योजना, वरिष्ठ नागरिक खाते, आर.टी.ओ.लायसन्स घरपोच योजना, स्पीड पोस्ट सेवा, व्हीपी सीओडी द्वारे पार्सल सुविधेसह एटीएम कार्डसुविधा सुरु केली आहे. पोस्टमास्तर नायक यांच्यासह मार्केटींग एक्झीक्युटिव्ह म्हणून एस.एस.लखानी व व्यवसाय शाखेचे व्ही.एस.बकाल तथा १९ कर्मचारी व सहा पोस्टमन टपाल खात्याची जबाबदारी पार पाडत आहे.