संततधार पावसामुळे भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 04:57 PM2019-07-31T16:57:44+5:302019-07-31T16:57:57+5:30

पांडवउमरा (वाशिम) : संततधार पावसामुळे पांडवउमरा येथील गजानन दत्ता कालापाड यांच्या घराची भिंत ३१ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास कोसळली.

Wall collapse due to rain | संततधार पावसामुळे भिंत कोसळली

संततधार पावसामुळे भिंत कोसळली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पांडवउमरा (वाशिम) : संततधार पावसामुळे पांडवउमरा येथील गजानन दत्ता कालापाड यांच्या घराची भिंत ३१ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास कोसळली. सुदैवान त्यामध्ये कोणतीही जीवितहाणी झाली नाही.
गत तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. ३१ जुलैच्या पहाटेदरम्यान गजानन कालापाड यांच्या घराची २५ फुट लांबीची विटा-मातीची भिंत कोसळली. सुदैवाने तेथे कुणी उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी नाही. पांडवउमरा गावात काही नागरिकांच्या घराच्या भिंती शिकस्त आहेत. संततधार पावसामुळे शिकस्त भिंती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेने गावाला भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी गावकºयांमधून होत आहे. कालापाड यांच्या घराची भिंत कोसळल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. याप्रकरणी संबंधित यंत्रणेने पाहणी करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करावा, अशी मागणी कालापाड यांच्यासह गावकºयांनी केली.

Web Title: Wall collapse due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम