वाघागड येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:39 PM2018-05-31T14:39:17+5:302018-05-31T14:39:17+5:30

शेलुबाजार - गुप्तेश्वर महादेव संस्थान वाघा गड येथे आयोजित वारकरी बाल संस्कार शिबिराचा समारोप बुधवारी करण्यात आली. 

Warkari Child Sanskar Campus in Waggad concludes | वाघागड येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा समारोप

वाघागड येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा समारोप

googlenewsNext
ठळक मुद्दे गुप्तेश्वर महादेव संस्थान भक्तीसागर, वाघागड येथे वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते.अभंग गाथा, गायन, वादन, प्रवचन, किर्तन, प्राथमिक औषधोपचार, व्यक्तिमत्व विकास तसेच सामाजिक आचारसंहिता आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.

 

शेलुबाजार - गुप्तेश्वर महादेव संस्थान वाघा गड येथे आयोजित वारकरी बाल संस्कार शिबिराचा समारोप बुधवारी करण्यात आली. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत शांतीपुरी महाराज (येवता) तर प्रमुख अतिथी म्हणून योगगुरू मनोहर इंगळे, वामनराव चौधरी, रवि पाटील मुंदे, गुरमितसिंग गुलाटी, डॉ खुरसुडे, नानाभाऊ ठोकळ, गजानन इंगळे व लहाने पाटील उपस्थित होते. संत नामदेव महाराजांच्या विचाराने पदक्रमण करीत ब्रम्हलीन गुरुवर्य ह.भ.प.जगदीश महाराज यांनी नावारूपास आणलेल्या गुप्तेश्वर महादेव संस्थान भक्तीसागर, वाघागड येथे वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. या निवासी वारकरी प्रशिक्षणामध्ये योग, काकडा, प्रार्थना, गीतापाठ, अभंग गाथा, गायन, वादन, प्रवचन, किर्तन, प्राथमिक औषधोपचार, व्यक्तिमत्व विकास तसेच सामाजिक आचारसंहिता आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक म्हणून ह.भ.प.रामेश्वर महाराज, ह.भ.प.मुरलीधर महाराज, ह.भ.प.कन्हैया महाराज, ह.भ.प.अनंता महाराज, शाम महाराज, सदानंद महाराज, विनायक महाराज, दिपक महाराज आदिंनी काम पाहिले. समाजाला दिशा देण्याचे व सुसंस्कारित पिढी घडविण्याचे काम वारकरी बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून झाले, असे उदगार ह.भ.प. वामन महाराज यांनी समारोपीय कार्यक्रमात काढले. रवि पाटील म्हणाले की या तिर्थक्षेत्राचा दर्जा वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी मिळून प्रयत्न करणे अपेक्षीत आहे. अध्यक्षीय समारोप करताना महंत शांतीपुरी महाराजांनी या तिर्थक्षेत्राचे पौराणिक स्थानमहात्म सांगीतले. कार्यक्रमासाठी धर्माळे, अनंता गिरी, नारायण लोणकर, मोतीराम बहादरे, संतोष पोदाडे तसेच परिसरातील भक्त, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्रम्हलीन गुरुवर्य ह.भ.प.जगदीश महाराज यांनी सुरुवात केलेल्या बाल संस्कार शिबिराचे आठवे वर्ष असून, संपूर्ण यशस्वीतेसाठी कोअर कमिटी व भक्तगण यांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविक ह.भ.प.रामेश्वर महाराज यांनी तर आभार संस्थानचे अध्यक्ष बाळू लकडे पाटील यांनी मानले.

Web Title: Warkari Child Sanskar Campus in Waggad concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.