राष्ट्रीय कार्यशाळेत ‘वारली’ चित्रशैली प्रकल्प सर्वोत्कृष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:53 PM2018-08-22T12:53:37+5:302018-08-22T12:54:10+5:30

राष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांनी तयार केलेला वारली चित्रशैली प्रकल्प सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरला. यामध्ये वाशिम जिल्हयातील निलेश मिसाळ या शिक्षकाचा समावेश होता.

'Warli' picture-making project best in national workshops! | राष्ट्रीय कार्यशाळेत ‘वारली’ चित्रशैली प्रकल्प सर्वोत्कृष्ट!

राष्ट्रीय कार्यशाळेत ‘वारली’ चित्रशैली प्रकल्प सर्वोत्कृष्ट!

Next
ठळक मुद्दे माझ्या राज्यातील हस्तकला या विषयावर प्रकल्प सादर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वाशिम जिल्हयातील निलेश मिसाळ या शिक्षकाचा समावेश होता.

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम) :      सांस्कृतीक मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत सांस्कृतिक स्त्रोत व प्रशिक्षण संस्था दिल्ली द्वारा देशातील विविध राज्यांतील शिक्षकांकरिता आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांनी तयार केलेला वारली चित्रशैली प्रकल्प सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरला. यामध्ये वाशिम जिल्हयातील निलेश मिसाळ या शिक्षकाचा समावेश होता.
भारतीय कला, संस्कृती, लोकनृत्य, लोककला, संगीत, गायन-वादन, नाटक, शास्त्रीय नृत्य, विविध हस्तकला, शिल्पकला, चित्रकला, इ. स्त्रोत, शिक्षण, व प्रशिक्षण ह्या प्रमुख उद्देशाने स्थापित  सांस्कृतिक स्त्रोत व प्रशिक्षण संस्था, दिल्ली द्वारा देशभरातील शिक्षकांकरीता ‘शालेय शिक्षणात हस्तकला कोशल्यांचा समावेश’ (इन्स्टीग्रेटींग क्राप्ट स्कील इन स्कुल इज्युकेशन) या विषयाची राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यशाळा ७ ते १८ आॅगष्ट २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. सांस्कृतिक स्त्रोत व प्रशिक्षण संस्थेच्या हैद्राबाद, तेलंगणा राज्य येथे झालेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेत देशाच्या विभिन्न राज्यांतील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. 
यात देशभरातून आलेल्या विविध राज्यांतील शिक्षकांकरीता माझ्या राज्यातील हस्तकला या विषयावर प्रकल्प सादर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांनी वारली चित्रशैली महाराष्ट्र राज्य या विषयावरील अतिशय उत्तम असा प्रकल्प सादर केला होता.   महाराष्ट्र राज्याच्या या उत्कृष्ट प्रकल्प लेखन व सादरीकरणाबद्दल सांस्कृतिक स्त्रोत व प्रशिक्षण संस्थेचे हैद्राबाद केंद्राचे विभागिय संचालक जी. कृष्णैय्या, कार्यशाळा संचालिका डॉ. लिपिका मैत्रा यांनी स्वागत करून सहभागी सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव केला. 

राज्यातील या ९ शिक्षकांचा होता समावेश
सांस्कृतीक स्त्रोत व प्रशिक्षण संस्थाव्दारा देशातील विविध राज्यातील शिक्षकांच्या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्यातील एकूण नऊ शिक्षकांचा समावेश होता. यात प्रेमचंद राठोड, बुलढाणा,  कुंदन वायकोले, अनिल गायकवाड, योगेश इंंगळे जळगाव, निलेश मिसाळ वाशिम, धनाजी कोळी, तानाजी चौधरी पुणे, सुनिल सरपाते वर्धा, बाबु खंदारे यवतमाळ या नऊ शिक्षकांचा समावेश होता.

राष्ट्रीय स्तरावरील शिक्षकाच्या या प्रशिक्षण कार्यशाळेकरीता वाशिम जिल्ह्यातील निलेश रमेशराव मिसाळ या प्राथमिक शिक्षकाचा समावेश आहे.  मंगरूळपीर तालुक्यातील मोहरी येथील रहीवाशी असलेले निलेश मिसाळ हे संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा, मंगरूळपीर येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. राष्ट्रीय कार्यशाळेत वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करून राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नावाचा ठसा उमटविला, त्याबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.

Web Title: 'Warli' picture-making project best in national workshops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.