वाशिम येथे दमदार पावसाची हजेरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:17 AM2017-10-12T01:17:27+5:302017-10-12T01:17:53+5:30
वाशिम : शहरामध्ये बुधवारी १ वाजतानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरामध्ये बुधवारी १ वाजतानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
यंदा वाशिम जिल्ह्यात ७0 टक्क्याच्या आसपास पर्जन्यमान झाले; परंतु टक्केवारी घटण्यासोबतच हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसल्याने मध्यम आणि लघू प्रकल्पांच्या पाणी पा तळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. एकीकडे पावसाची स्थिती बिकट झाली असताना दुसरीकडे कडक ऊन तापत असल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे.
अशात बुधवारच्या ढगाळी वातावरणात पावसाने हजेरी लावली. वृत्त लिहिस्तोवर पाऊस जोमाने सुरूच होता. असाच पाऊस सुरू राहिल्यास शहरातील पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पावसामुळे नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
जिल्हय़ाच्या तुलनेत वाशिम शहर परिसरात अल्प पाऊस झाला आहे. पाऊसच नसल्याने जुमडा बॅरेजसचे पाणी शहराला पाणी पुरवठा करणार्या एकबुर्जी प्रकल्पात टाकण्यावर विचार करण्या त येत असताना शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची जाणवणारी टंचाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता दिसून येत आहे.
मंगरुळपीर येथेही जोरदार पाऊस
वाशिम शहरात दुपारी १ वाजतापासून जोरदार पावसास सुरुवात झाली. त्याचदरम्यान मंगरुळपीर तालुक्यातही काही भागात जोरदार पावसाचे आगमन झाले.
शहरात दुपारी १ वाजतापासून जोरदार पावसास सुरुवात झाली. तत्पूर्वी संपूर्ण शहरात ढगाळ वातावरणामुळे अंधार पसरला होता. दुपारीच संध्याकाळ झाल्याचे चित्र दिसून आले.