अतिवृष्टीचा इशारा; १७ जूनपर्यंत पेरण्या टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:28 AM2021-06-11T04:28:08+5:302021-06-11T04:28:08+5:30

वाशिम : जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची खरीप हंगाम २०२१ मधील शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे. ...

Warning of heavy rain; Avoid sowing till June 17 | अतिवृष्टीचा इशारा; १७ जूनपर्यंत पेरण्या टाळा

अतिवृष्टीचा इशारा; १७ जूनपर्यंत पेरण्या टाळा

Next

वाशिम : जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची खरीप हंगाम २०२१ मधील शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने १७ जूनपर्यंत पेरण्या टाळण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी पेरणी करीत आहे. प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र, नागपूर यांनी हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार विदर्भात १० ते १३ जून दरम्यान वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वारेसुद्धा ताशी ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वाहणार आहे. राज्यस्तरावरसुद्धा कृषी विभागाच्या वतीने दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी १७ जूनपर्यंत पेरण्या करण्यात येऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनी पुढील तीन-चार दिवसात पेरणी केल्यास अतिवृष्टीमुळे पेरणी दडपण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. जिल्ह्यातील एकूण ४६ महसूल मंडळांपैकी नागठाणा, रिसोड, गोवर्धन, रिठद, कवठा, शिरपूर, मंगरूळपीर, शेलू, पोटी, मानोरा, शेंदुर्जना व गिरोली या महसूल मंडळात ७५ मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Warning of heavy rain; Avoid sowing till June 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.